News Flash

शरीरावर खाज सुटल्यामुळे त्रस्त आहात? मग ‘हे’ उपाय नक्की करा

या घरगुती उपायांनी करा समस्या दूर

बऱ्याच वेळा आपल्या हाताला किंवा पायांन अचानकपणे खाज सुटू लागते. परंतु, या खाज येण्यामागचं नेमकं कारण लक्षात येत नाही. अनेक वेळा वातावरण बदल झाला, त्वचेतील आर्द्रता कमी होणे, एखाद्या गोष्टीची अॅलर्जी यांमुळे शरीरावर खाज येते. परंतु, अतिप्रमाणात खाजवल्यास त्वचेला हानी पोहोचून संसर्ग होण्याची शक्यता असते. त्यामुळे शरीरावर येत असलेली खाज कमी करण्यासाठीचे काही घरगुती उपाय पाहुयात.

१. कोरफड –
अनेक त्वचाविकारांवर रामबाम औषध म्हणजे कोरफड. शरीरावर खाज येत असल्यास त्या भागावर कोरफडीचा गर किंवा अॅलोवेरा जेल लावावं. हा गर लावल्यानंतर तो काही काळ तसाच ठेवावा आणि नंतर गार पाण्याने तो भाग स्वच्छ पुसून घ्यावा. त्यामुळे खाज आलेल्या जागेवर कोणत्याही प्रकारचे लाल पट्टे येत नाहीत.

२. पेट्रोलियम जेली –
पेट्रोलियम जेलीचे कोणतेही दुष्परिणाम होत नसल्यामुळे खाज येत असलेल्या जागेवर ती लावू शकता. ही जेली लावल्यामुळे शरीरावरी खाज कमी होते. त्यामुळे त्वचेचे नुकसान होण्यापासून तुमचा बचाव होतो.

३. खोबरेल तेल-
अनेक वेळा त्वचा कोरडी पडल्यामुळे किंवा एखाद्या किटकाने दंश केल्यामुळे शरीरावर खास सुटते. अशावेळी खाज येत असलेल्या भागावर खोबरेल तेल लावावं. तेलामुळे शरीरावरील खाज कमी होते.

४. तुळस –
त्वचेवर खाज सुटल्यानंतर त्या भागावर तुळशीची काही पाने चोळा किंवा या पानांचा काढा काढून तो काढा खाज येत असलेल्या भागावर लावा.

५. ओटमील –
नाश्त्यामधील एक प्रकार म्हणजे ओट्स. या ओट्समध्ये अनेक गुणधर्म असून ओटमीलपासून तयार केलेली पावडरही तितकीच उपयुक्त आहे. या पावडरमध्ये अँटीइन्फ्लेमेटरी प्रॉपर्टीजचे प्रमाण असते. त्यामुळे खाज सुटलेल्या भागावर ही पावडर लावल्याने खाज कमी होऊन पुरळ आले असल्यास ते कमी होते. त्यासाठी एक कप पावडरमध्ये थोडंसं पाणी मिसळून याची घट्ट पेस्ट तयार करावी. ही पेस्ट खाज सुटलेल्या भागावर लावून थोड्यावेळाने कोमट पाण्याने हा लेप काढावा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 4, 2020 4:22 pm

Web Title: lifestyle home remedy is done by the skin after itching ssj 93
Next Stories
1 Google चा ‘स्वस्त’ Pixel 4a झाला लाँच, जाणून घ्या किंमत आणि डिटेल्स
2 पोटदुखीपासून ते अन्नपचन होईपर्यंत ओवा खाण्याचे ७ फायदे
3 64MP कॅमेऱ्यासह तब्बल 6000mAh क्षमतेची बॅटरी, जाणून घ्या Samsung Galaxy M31s चे दमदार फीचर्स
Just Now!
X