News Flash

फक्त 99 रुपये महिना; Netflix, Amazon Prime ला टक्कर देण्यासाठी आलं नवीन ओटीटी अ‍ॅप

हॉलिवूडमधील प्रीमियम कंटेंट अनेक भारतीय भाषांमध्ये

प्रीमियम ग्लोबल स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म Starz ने भारतात आपलं स्वतंत्र डायरेक्ट टू कन्झ्युमर ओटीटी अ‍ॅप ‘लायन्सगेट प्ले’ लाँच केलं आहे. लायन्सगेट प्ले अ‍ॅपवर हॉलिवूडमधील प्रीमियम कंटेंट अनेक भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहे.

भारतात लायन्सगेट प्लेची नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओ, झी-5, हॉटस्टार आणि एमएक्स प्लेयर यांसारख्या लोकप्रिय ओटीटी अ‍ॅप्ससोबत असेल. लायन्सगेट प्ले अ‍ॅपमध्ये ओरिजिनल फिचर फिल्म्सशिवाय टीव्ही शोज, अ‍ॅक्शन, थ्रिलर आणि कॉमेडी अशा विविध कंटेंट आणि प्रीमियरचा समावेश आहे.

लायन्सगेट प्लेने दोन प्लॅन आणले आहेत. त्यातील एक 699 रुपयांचा आहे. या प्लॅनची वैधता एक वर्ष आहे. तर, मंथली प्लॅनची किंमत 99 रुपये आहे. लायन्सगेट प्ले अ‍ॅप गुगल प्ले स्टोअर, अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअर आणि अ‍ॅमेझॉन फायरस्टिक या तिन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असेल.

Starz एक आंतरराष्ट्रीय स्ट्रीमिंग अ‍ॅप आहे. सर्वप्रथम 2018 मध्ये हे अ‍ॅप लाँच झालं होतं. हे युरोप, लॅटिन अमेरिका, कॅनडा, जपान आणि भारतासह 55 देशांमध्ये उपलब्ध आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, लायन्सगेट प्ले अ‍ॅपवर जेनिफर लोपेज अभिनीत हस्लर्स, गेराल्ड बटलरचा साहसी थरारपट ‘एंजल हॅज फॉलन’, ह्यूज ग्रांट अभिनीत साहसी विनोदपट ‘द जेंटलमेन’ यांसारखे अनेक सिनेमे बघता येतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 4, 2020 4:39 pm

Web Title: lionsgate play officially launched in india by starz sas 89
Next Stories
1 पनीर खाण्याचे ‘हे’ फायदे वाचून नक्कीच कराल आहारात समावेश
2 Jio ने गेमिंग स्टार्टअप Krikey मध्ये केली गुंतवणूक, लाँच झाला ‘यात्रा’ गेम; आकाश अंबानी म्हणतात….
3 WhatsApp च्या नवीन अटी स्वीकारा, नाहीतर अकाउंट Delete करा !
Just Now!
X