15 October 2019

News Flash

थंडीत अशी घ्या ओठांची काळजी

घरगुती उपायानेही ओठांची असह्य जळजळ थांबली तर

हिवाळ्यात तर ओठाच्या बऱ्याच समस्या निर्माण होतात. हिवाळ्याला आरोग्यदायी ऋतू म्हटले जाते. मात्र या ऋतूमध्ये तुम्ही आरोग्याची काळजी व्यवस्थित घेतली नाही तर त्याचे दुष्परिणाम तुम्हाला भोगावे लागतात. थंडीत बऱ्याच जणांचे ओठ फुटतात. यावर उपाय म्हणून लिप बाम लावणे योग्यच. पण महागड्या लीप बामपेक्षा घरगुती उपायानेही ओठांची असह्य जळजळ थांबली तर…जाणून घेऊयात घरगुती उपाय

१. ओठांवर दुधाची साय लावल्याने फुटलेले ओठ मुलायम होतात.

२. या ऋतूत जास्तीत जास्त पाण्याचे सेवन करा. त्यामुळे त्वचेसह ओठांनाही फायदा होतो.

३. जर ओठ कोरडे पडले असतील तर मॅट लिपस्टिक लावणे टाळा. त्याऐवजी क्रिमी किंवा शेअर टेक्सचर असलेल्या लिपस्टिक वापरल्याने ओठ मॉइश्चराइज होतात. मॅट लिपस्टिकचा वापर करायचा असल्यास तर लिपस्टिक लावण्याआधी लिपकेअर लोशन लावा. त्यामुळे तुमचे ओठ मॉइश्चराइज होऊन लिपस्टिक नीट सेटही होते.

४. ओठांवर वारंवार जीभ फिरवू नका. त्यामुळे ओठ जास्त कोरडे होण्याची शक्यता असते.

५. फुटलेल्या ओठांवरची त्वचा काढून टाकू नका. त्यामुळे ओठाला जखम होऊन रक्तही येऊ शकते.

६. ओठांवर मध लावल्याने मुलायम होण्यास मदत होते.

७. दिवसातून दोन वेळा ऑलिव्ह ऑइल किंवा खोबरेल तेल फुटलेल्या ओठांवर लावल्याने आराम मिळतो.

८. ई-जीवनसत्त्व असलेल्या पदार्थांचे सेवन जास्त प्रमाणात करा.

First Published on January 7, 2019 10:19 pm

Web Title: lip care in winter