26 November 2020

News Flash

Jio चे जबरदस्त रिचार्ज प्लॅन, दररोज मिळतो 3GB डेटा; जाणून घ्या डिटेल्स

जर तुमच्याकडेही रिलायन्स जिओचं प्रीपेड कनेक्शन असेल आणि तुम्हाला जास्त डेटाची आवश्यकता असेल तर ही बातमी तुमच्या कामाची

(संग्रहित छायाचित्र)

जर तुमच्याकडेही रिलायन्स जिओचं प्रीपेड कनेक्शन असेल आणि तुम्हाला जास्त डेटाची आवश्यकता असेल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. आज आम्ही तुम्हाला दररोज 3जीबी डेटा देणाऱ्या जिओच्या तीन शानदार प्लॅन्सबाबत माहिती देणार आहोत. हे तिन्ही प्लॅन अनुक्रमे 349 रुपये, 401 रुपये आणि 999 रुपयांचे आहेत. जाणून घेऊया सविस्तर :-

349 रुपयांचा प्लॅन :-
या प्लॅनची वैधता 28 दिवसांची आहे. यामध्ये दररोज 3 जीबी डेटा म्हणजे एकूण 84 जीबी डेटा मिळतो. या प्लॅनमध्ये जिओ टू जिओ कॉलिंग अनलिमिटेड आहे, तर अन्य नेटवर्कवर कॉलिंगसाठी 1,000 मिनिटे मिळतात. या प्लॅनमध्ये दररोज 100 मेसेज पाठवण्याची सुविधाही मिळेल.

401 रुपयांचा प्लॅन :-
हा प्लॅन ज्या युजर्सना मोफत Disney+ Hotstar चं सबस्क्रिप्शन हवंय त्यांच्यासाठी उत्तम आहे. या प्लॅनची वैधताही 28 दिवसांची आहे. पण यामध्ये दररोज 3 जीबी डेटाशिवाय 6 जीबी अतिरिक्त म्हणजे एकूण 90 जीबी डेटा मिळतो. या प्लॅनमध्येही रोज 100 मेसेज आणि अन्य नेटवर्कवर कॉलिंगसाठी 1,000 मिनिटे मिळतात. याशिवाय एका वर्षासाठी Disney+ Hotstar चं मोफत सबस्क्रिप्शनही मिळेल.

999 रुपयांचा प्लॅन :-
जिओच्या या तिसऱ्या प्लॅनमध्येही दररोज 3जीबी डेटा म्हणजेच एकूण 252 जीबी डेटा मिळतो. 84 दिवस इतकी या प्लॅनची वैधता असून यामध्ये अन्य नेटवर्कवर कॉलिंगसाठी 3,000 मिनिटे आणि दररोज 100 मेसेज पाठवण्याची सुविधा मिळते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 20, 2020 4:40 pm

Web Title: list of all reliance jio plans that offers 3gb data per day check details sas 89
Next Stories
1 स्वस्त झाला लेटेस्ट ‘बजेट’ स्मार्टफोन, 5000mAh च्या दमदार बॅटरीसह एकूण चार कॅमेरे
2 Whatsapp वर खूप व्हिडिओ पाठवतात? तुमच्यासाठी येतंय खास फिचर
3 व्हिडिओमध्ये जाहिरात दाखवणार Youtube, पण क्रिएटर्सना नाही मिळणार पैसे
Just Now!
X