डॉ. मोहन थॉमस

सध्याच्या फॅशनच्या युगात कोणती स्टाइल कधी लोकप्रिय होईल हे सांगणं अवघड आहे. आतापर्यंत मुलांमध्ये क्लीन शेवच्या ट्रेंडची चलती होती. पण आता सगळेजण दाढी वाढवताना दिसत आहेत. पण दाढी वाढवणं जरी सोप असलं तरी सुद्धा तिची काळजी घेणं हे तितकचं अवघड आहे. सध्या करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात २१ दिवसांच्या लॉकडाउनची घोषणा केली आहे. या काळात सलूनदेखील बंद आहेत. त्यामुळे अनेक तरुणांनी दाढी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र दाढी वाढवताना विशेष काळजी घेतली पाहिजे.  ‘सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँण्ड प्रिव्हेंशन’ (सीडीसी) या संस्थेने दाढी वाढवणाऱ्या व्यक्तींना व्हायरसचा धोका सर्वाधिक असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे पुढील काही दिवस केसांची आणि दाढीची योग्य पद्धतीने निगा राखणे गरजेचं आहे.

Ram Navmi 2024 Ram Raksha Stotra Reading Benefits in Marathi
Ram Navami 2024 : जाणून घ्या ‘रामरक्षा’ अन् भगवान शंकराचा ‘हा’ संबंध; पाहा, दररोज रामरक्षा स्तोत्र म्हटल्याचे फायदे
happiness hashtag, balmaifal happiness
सुखाचे हॅशटॅग: गोष्ट छोटीशी, पण महत्त्वाची!
Blood Pressure drug
रक्तदाबाची औषधे मधेच बंद केल्याने तुम्हाला अधिक नुकसान होऊ शकते? काय सांगतात डाॅक्टर… 
Counselling how to break up without revenge
समुपदेशन : नातं तोडायचंय? पण सूडाशिवाय…

करोना विषाणूने केवळ लोकांच्या हालचालींवरच मर्यादा आणल्या नाहीत तर शारीरिक स्वच्छतेलाही केंद्रबिंदू बनवले आहे. या आजाराला दूर ठेवण्यासाठी वारंवार हात स्वच्छ धुवणे आणि सॅनिटायझर्सचा वापर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यातच आता पुरूषांनी दाढीची काळजी घेणे सुद्धा तितकेच महत्त्वाचे झाले आहे.  वाढलेल्या दाढीमुळे आपण रुबाबदार दिसतो असं प्रत्येक तरुणाला वाटतं. मात्र दाढी वाढविल्यानंतर तिची काळजी घेणंही तितकंच गरजेचं आहे. नाही तर हातामार्ग कोणताही संसर्ग किंवा विषाणूचा प्रादुर्भाव दाढीपर्यंत पोहोचू शकतो.

अशी घ्या दाढीची काळजी –

१. दाढी नियमितपणे धुणे –

केसांसह दाढी सुद्धा नियमित धुतली पाहिजे. दररोज दाढी शॅम्पूने धुवावी. तसंच केसांना लावायचं कंडिशनरही तुम्ही वापरु शकता. त्यामुळे दाढी स्वच्छ राहते. तसंच दाढी स्वच्छ असेल तर विषाणूंचा प्रादुर्भाव आणि बॅक्टेरिया किंवा बुरशीजन्य संसर्गाची शक्यता कमी होते.

२.दाढीला नियमित ब्रश करा –

दाढीला दररोज ब्रश केल्याने मृत त्वचा निघून जाते आणि केसांच्या मुळांना योग्य पद्धतीने रक्तपुरवठा होण्यास मदत मिळते. त्यामुळे दाढी नियमितपणे ब्रश करणे महत्त्वाचे आहे. यामुळे दाढी अधिकच चमकदार दिसते.

३. दहीचा वापर करावा –

दाढी केल्यानंतर चेहऱ्याची आग होते किंवा चेहऱ्यावर डाग दिसतात, अशी तक्रार अनेकजण करतात. अशावेळी चेहऱ्याची आग थांबावी म्हणून चेहऱ्याला दही लावावं. दही हा थंड पदार्थ आहे. तसंच त्यात  लॅक्टिक अँसिडचं प्रमाण अधिक असते. त्यामुळे जळजळ होत असलेल्या भागाला थंडावा मिळतो आणि त्वचा तजेलदारही होते.

४. मॉइश्चरायझर्सचा वापर –

दाढीचे तेल किंवा मॉइश्चरायझिंग हे तुमच्या दाढीचे केस निरोगी ठेवतात. रक्ताभिसरण क्रियाही योग्यपद्धतीने कार्य करते. त्यामुळे केस अधिक आकर्षित दिसतात. याशिवाय, मॉइश्चरायझर्स त्वचेला नैसर्गिक हायड्रेशन देतात.

५. दाढीचे आकारमान –

बऱ्याचदा लोक घरातच दाढी ट्रिमिंग करण्यास किंवा आकार देण्याला अनन्यसाधारण महत्त्व देतात. खरंतर दाढीला आकार देणं हा दाढी सुंदर दिसावी यामागील उद्देश असतो. परंतु, दाढीला योग्य आकार दिल्यास ती अधिक आकर्षित दिसते.

(डॉ. मोहन थॉमस, वरिष्ठ कॉस्मेटिक सर्जन, कॉस्मेटिक सर्जरी इन्स्टिट्यूट मुंबई)