डॉ. मुबश्शीर मुझम्मिल खान

करोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात ३१ दिवसांचा लॉकडाउन केला आहे. त्यामुळे देशातील सारे नागरिक सध्या घरी राहूनच त्यांचा वेळ आणि वर्क फ्रॉम होम करत आहेत. मात्र या काळात शाळा बंद असल्यामुळे लहान मुलांनादेखील त्यांचा संपूर्ण वेळ घरातच व्यतीत करावा लागत आहे. मात्र सतत घरात राहून कंटाळलेली ही मुलं त्यांचा वेळ मोबाइल किंवा टॅब पाहण्यातच घालवत आहेत. त्यामुळे लहान मुलांचा स्क्रीन टाइम प्रमाणापेक्षा अधिक असेल तर त्यांच्यात लठ्ठपणा, मान दुखणे, थकवा येणे, डोळ्यांवर ताण येणे आणि मेंदूची रचना व कार्य यावरही परिणाम होऊ शकतो. परंतु मुलांना या सवयीतून बाहेर काढायचं असेल तर त्यांना रागवून किंवा मारुन न समजावता. त्यांना स्क्रीन टाइम कसा मर्यादित ठेवता येईल याचं महत्त्व पटवून द्या. विशेष म्हणजे या विषयी मुलांशी कसा संवाद साधायचा हे डॉ. मुबश्शीर मुझम्मिल खान यांनी सांगितलं आहे.

करोना व्हायरस (सीओव्ही) हा विषाणूंच्या कुटुंबातील एक विषाणू आहे. या विषाणूमुळे श्वसनाशी संबंधित आजार होतात. यात सध्या सर्दीपासून ते मिडल ईस्ट रेस्पिरेटरी सिण्ड्रोम (एमईआरएस (मर्स) – सीओव्ही) आणि सिव्हिअर अॅक्युट रेस्पिरेटरी सिण्ड्रोम (सार्स – सिओव्ही) यासारख्या गंभीर आजारांचा समावेश आहे. या वर्षाच्या सुरुवातीला करोना व्हायरसच्या एका नवीन प्रकाराचा शोध लागला. हा विषाणू यापूर्वी मानवाला माहित नव्हता. त्याला नॉव्हेल (नवीन) करोनाव्हायरस (nCov) असेही म्हणतात. ताप, खोकला, श्वास घेण्यास अडथळा निर्माण होणे ही या आजाराची लक्षणे आहेत. करोना विषाणूच्या प्रसार होऊ नये यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देश पातळीवर लाॉकडाऊन लागू केले आहे. त्यामुळे मुले बराच काळ मोबाइलवर खेळत बसण्याची शक्यता आहे. तुम्हाला स्क्रीन टाइमच्या परिणामांची खूप काळजी वाटत असेल तर तुम्ही तुमच्या मुलांना तो कमी करण्याचे महत्त्व समजावून सांगितले पाहिजे.

मुलांचा स्क्रीन टाइम कमी करण्यासाठीच्या काही महत्त्वाच्या टिप्स –

टेक्नोलॉजी फ्री झोन्स : ज्या ठिकाणी मुलांना स्मार्टफोन किंवा लॅपटॉप वापरता येणार नाही, असे टेक्नोलॉजी-फ्री झोन तयार करण्याचा प्रयत्न करा. तुमच्या मुलांना कुटुंबियांसमवेत चांगल्या प्रकारे वेळ घालविण्यासाठी प्रोत्साहन द्या. जेवताना किंवा कुटुंब समवेत बसून गप्पा मारत असताना मुले मोबाइल फोन किंवा लॅपटॉप वापरणार नाही, याची खातरजमा करा.

 

डिजिटल डिटॉक्स – तुमच्या संपूर्ण कुटुंबालामध्येच ‘डिजिटल डिटॉक्स’ची सवय अंगी बाणविण्याचा प्रयत्न करा. एका निश्चित कालावधीसाठी डिजिटल उपकरणांपासून दूर राहा आणि त्यांचा वापर करू नका. तुम्ही किंवा तुमची मुले झोपण्याच्या तासभर आधी मोबाइल फोन किंवा टॅबचा वापर बंद करतील, याची खातरजमा करा. त्याऐवजी एकमेकांसमवेत वेळ घालवा.

 

कंटेन्टवर लक्ष ठेवा : अश्लील कंटेन्टपासून मुलांचे रक्षण करा. तुमचे मूल ऑनलाइन असताना कोणत्या प्रकारचा कंटेन्ट पाहत आहे, याकडे लक्ष ठेवा. कारण मुले हिंसक अथवा आक्रमक होऊ शकतात. बेडरूमध्ये असताना टीव्ही पाहण्याची किंवा मोबाइल फोन वापरण्याची परवानगी देऊ नका. मुलांच्या त्यांचा स्वत:चा मोबाइल अथवा टॅबलेट देऊ नका. त्यांच्या वापरावर मर्यादा घाला. मुलांनी टीव्ही कधी पाहावा किंवा मोबाइल कधी वापरावा याचे वेळापत्रक निश्चित करा.

 

मुलांना प्रशिक्षित करा : घातक कंटेन्टचे धोके तुमच्या मुलांना समजावून सांगा. हिंसक गेम खेळणे किंवा हिंसक चित्रपट पाहल्याने त्यांच्या मन:शांतीवर कशा प्रकारे परिणाम होईल, ते त्यांना समजावून सांगा. सोशल मीडिया वापरण्याचे नियम निश्चित करा आणि तुमच्या मुलाकडून पासवर्ड्स घ्या.

 

इनडोअर गेम्स : तुमच्या मुलांना इनडोअर गेम्स खेळण्यासाठी, पुस्तके वाचण्यास, कोडी सोडविण्यास आणि गाणी ऐकण्यास प्रोत्साहन द्या. त्याची/तिची कल्पकता वाढविण्यास मदत करा. कुटुंबाने एकत्रितपणे काही अॅक्टिव्हिटी करा. विज्ञान व तंत्रज्ञान किंवा समान्यज्ञानासारख्या रोचक विषयांबद्दल मुलांना माहिती द्या.

(लेखक सल्लागार निओनॅटोलॉजिस्ट आणि बालरोगतज्ज्ञ, मदरहूड हॉस्पिटल, खारघर, नवी मुंबई येथील आहेत. )