20 October 2020

News Flash

व्यसनमुक्त होण्यासाठी Lockdown चा काळ उत्तम; करा ‘हे’ घरगुती उपाय

धुम्रपान व मद्यपान यांसारख्या घातक सवयी आरोग्यास घातक ठरतात

– प्रांजल डांगे
बदलत्या जीवनशैलीत धुम्रपान व मद्यपान करणे, ही एक फॅशन झाली आहे. अनेक जण मजा म्हणून किंवा अनुभव म्हणून सहज व्यसन करुन पाहतात. मात्र नंतर ती सवय लागते आणि व्यक्ती या व्यसनांच्या आहारी जातात. एकदा व्यसनाच्या आहारी गेल्यानंतर त्यातून बाहेर पडणे अनेकांना शक्य होत नाही. विशेषतः धुम्रपान व मद्यपान यांसारख्या घातक सवयी आरोग्यास घातक ठरतात. त्यामुळे या व्यसनापासून दूर राहणं हा एकच पर्याय आहे. परंतु, वर्षानुवर्ष धुम्रपान किंवा मद्यपान करणाऱ्या माणसांचं व्यसन सोडवणं हे खूपच अवघड असतं. पण जर इच्छा असेल तर नक्कीच तुम्ही तंबाखूच्या व्यसनापासून दूर जाऊ शकता. विशेष म्हणजे सध्याच्या लॉकडाउनचा काळावधी हे व्यसन सोडण्यासाठी अतिशय फायदेशीर ठरत आहे. कारण, सध्या लॉकडाऊनमुळे सारं काही बंद असल्यामुळे सहाजिकच तंबाखूजन्य पदार्थ व मद्य यांची दुकानंही बंद आहेत. परिणामी, हा काळ व्यसन सोडविण्यासाठी फायदेशीर असल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे घरात राहून सहज सोप्प्या पद्धतीने आपण हे व्यसन सोडवू शकतो.

दारू व सिगारेट सोडण्याचे सहज-सोपे घरगुती उपाय

१. तंबाखूचे व्यसन सोडायचे असल्यास शुगरलेस गम चावून खा. गाजर, मुळा, काकडी अशा कुरकुरीत भाज्या खा.

२. गाजराचा रस नियमित प्यायल्यास दारूचे व्यसन सोडता येऊ शकते.

३.धुम्रपान किंवा मद्यपान हे व्यसन सोडण्यासाठी योग्य ते व्यवस्थापन करा.

४. धुम्रपानाकडे दुर्लक्ष करा –

दारू किंवा सिगारेट सेवनाची इच्छा झाल्यास ती टाळण्यासाठी स्वतःचे मन विचलित करण्याचा प्रयत्न करा. स्वतःला अन्य कुठल्या तरी कामात व्यस्त करून घ्या. घरात धुम्रपानरहित झोन तयार करण्याचा प्रयत्न करा. याशिवाय जुनी गाणी ऐका, मित्रांशी सोशल मीडियाच्या माध्यातून संवाद साधा, चित्र काढा, पुस्तक वाचणे किंवा बागकाम करणे, अशा कामांमध्ये स्वतः रमवून घ्या. यामुळे तुमचे मन आनंदी व प्रसन्न राहिल.
५. व्यसन करणाऱ्या मित्रांपासून शक्यतो दूर राहण्याचा प्रयत्न करा.

६. धूम्रपान निवारण थेरपी –

धुम्रपानाचे व्यसन सोडण्यासाठी व्यसनमुक्ती केंद्राचा आधार घेऊ शकता. याशिवाय आपण स्वतःचे समुपदेशन देखील करू शकता.व्यसनमुक्तीसाठी तंबाखू सोडलेल्या एखाद्या व्यक्तीची मदत घेण्याचाही प्रयत्न करा. यामुळे नक्कीच फायदा होऊ शकतो.
७. व्यसन न करण्याची सवय लावा –

इच्छाशक्ती असल्यास कुठल्याही व्यसनापासून दूर राहता येऊ शकतं. यासाठी सुरूवातीला एखाद्या व्यक्तीने ठरवले की, आपणं सलग तीन दिवस व्यसन करणार नाही. त्यानंतर आणखीन सहा दिवस असे जवळपास महिनाभर व्यसन न केल्यास संबंधित व्यक्तीला त्याची सवय होऊन जाते. कालांतराने हळुहळू ही व्यक्ती व्यसनापासून दूर जाते.
८. मानसिकतेचा सराव करा –

व्यसन सोडवण्यासाठी व्यक्तीचे मन स्थिर असणे गरजेचे आहे. यासाठी नियमित ध्यान, योगा करणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर ठरते.
९. दररोज व्यायाम करा –

रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी आणि तंदुरूस्त राहण्यासाठी दररोज व्यायाम करा. यात चालण्याचा व्यायाम आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. परंतु, अन्य व्यायाम प्रकार करताना तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार करणे गरजेचं आहे.

१०. मानसिक स्वास्थ राखण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या –

मानसशास्त्रज्ञ किंवा मनोचिकित्सकांचे समुपदेशन करणारे मानसिक आरोग्य व्यावसायिक आपल्याला आपला ताण कमी करण्यास निश्चितपणे मदत करतील आणि परिस्थितीशी सामोरे जाण्यास मदत करतील.

(लेखिका, प्रांजल डांगे, एशिनय कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये सायको-ऑन्कोलॉजिस्ट (समुपदेशन मानसशास्त्रज्ञ) आहेत.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 31, 2020 1:44 pm

Web Title: lockdown world no tobacco day 2020 ssj 93
Next Stories
1 धूम्रपान सोडण्यासाठी करा हे उपाय..
2 तुमच्या आजुबाजूलाही सिगारेट ओढणारे आहेत? मग हे वाचाच
3 हायपोथायरॉईड, मधुमेह आणि स्थूलपणा असलेल्या तरुणांना वेळेत उपचार देणे गरजेचे
Just Now!
X