News Flash

Royal wedding dresses : राजघराण्यातील हे सुंदर वेडिंग ड्रेस पाहिलेत का?

लग्नात त्यांनी सिल्कचा वेडिंग ड्रेस तयार करुन घेतला. त्यावर दहा हजार मोती जडवण्यात आले होते.

(छाया सौजन्य Wikimedia commons, Express Archives, AP)

ब्रिटनच्या शाही कुटुंबात शनिवारी १९ मे रोजी मेगन मर्केल आणि प्रिन्स हॅरी यांचा शाही विवाहसोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागून आहे. भव्य विवाहसोहळा पाहण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत. या निमित्तानं मेगनचा वेडिंग ड्रेस कसा असेल याच्याही चर्चा आहेत. परंपरेनुसार वेडिंग ड्रेस आधी राणी पाहते तिनं संमत्ती दिल्यानंतर नववधुला तो विवाहसोहळ्यात परिधान करता येतो. मेगनच्या वेडिंग ड्रेसबाबत खूपच गुप्तता पाळण्यात आली आहे. हा वेडिंग ड्रेस लग्नाआधी कोणालाही पाहता येणार नाही. सध्या ब्रिटनमध्ये मेगन कोणत्या फॅशन डिझायनरच्या वेडिंग गाऊनला पसंती देणार आहे यावर अनेकांनी सट्टे लावले आहे. तिचा वेडिंग ड्रेस नक्कीच फॅशन विश्वात ट्रेंडसेटर ठरणार आहे. चला तर मग गेल्या काही वर्षांतील राजघराण्यातील वेडिंग ड्रेसेस बद्दल जाणून घेऊयात.

राणी एलिझाबेथ द्वितीय यांचा वेडिंग ड्रेस

राणी एलिझाबेथ द्वितीय या २० नोव्हेंबर १९४७ मध्ये प्रिन्स फिलीप्स माऊंटबॅटन यांच्यासोबत विवाहबंधनात अडकल्या. त्यावेळी २१ वर्षांच्या राणी एलिझाबेथ यांचा वेडिंग ड्रेस नॉर्मन हार्टनेल यांनी डिझाइन केला होता. त्यांना मिळालेल्या रेशनिंग कुपन्स वापरून त्यांनी यासाठी कापड खरेदी केलं होतं. त्या राजघराण्यातील सदस्य असल्यानं त्यांना २०० अतिरिक्त कुपन्स देण्यात आले होते पण त्यांनी ते प्रांजळपणे नाकारले. लग्नात त्यांनी सिल्कचा वेडिंग ड्रेस तयार करुन घेतला. त्यावर दहा हजार मोती जडवण्यात आले होते.

प्रिन्सेस डायना यांचा वेडिंग ड्रेस

प्रिन्सेस डायना यांचा वेडिंग ड्रेस हा आजही चर्चेचा विषय असतो. २९ जुलै १९८१ रोजी त्या प्रिन्स चार्ल्ससोबत विवाहबंधनात अडकल्या. ८० च्या दशकातील त्याचा पांढरा गाऊन सगळ्यांनाच आवडला होता. पफ स्लिव्ह असलेला सिल्क बॉलगाऊन त्यांनी परिधान केला होता. त्यावर दहा हजारांहून अधिक मोती जडवले होते.

केट मिडलटन यांचा वेडिंग ड्रेस

२९ एप्रिल २०११ मध्ये केट आणि प्रिन्स विल्यम विवाहबंधनात अडकले. यावेळी केट यांनी अॅलेक्झँडर मॅक्वीनचा वेडिंग गाऊन परिधान केला होता . जो आतापर्यंतचा सर्वात महाग वेडिंग गाऊन मानला जातो. ज्याची किंमत दोन कोटींहूनही अधिक असल्याचं म्हटलं जात आहे.

ग्रेस केली वेडिंग ड्रेस

अमेरिकन अभिनेत्री ग्रेस केली या मोनॅकोचे प्रिन्स रेनर तृतीय यांच्यासोबत १९५६ साली विवाहबंधनात अडकल्या. त्यांच्या वेडिंग ड्रेसवर १२५ वर्ष जुनी लेस आणि मोती जडवण्यात आले होते.

शार्लन ऑफ मोनॅको

दक्षिण आफ्रिकन स्विमर शार्लन विट्स्टॉक या प्रिन्स अल्बर्ट ऑफ मोनॅको द्वितीय यांच्यासोबत विवाहबंधनात अडकल्या. यावेळी त्यांनी ऑफ शोल्डर अर्मानीच्या वेडिंग गाऊनला पसंती दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 18, 2018 3:08 pm

Web Title: look at history top 5 most beautiful royal wedding dresses
Next Stories
1 OnePlus 6 ची किंमत अखेर जाहीर
2 टीव्हीपासून दूर राहण्यासाठी ‘हे’ उपाय करुन पाहा
3 वेडिंग अल्बम निवडण्यापूर्वी हा व्हिडिओ नक्की पाहाच!
Just Now!
X