28 November 2020

News Flash

डेटवर जाताय? मग ‘या’ टीप्स लक्षात ठेवाच

डेटवर जाताय? मग 'या' ५ टीप्स आवर्जून वाचा

जगातील सगळ्यात सुंदर भावना कोणती असा प्रश्न विचारला तर अनेकांचं उत्तर प्रेम हेच येईल. प्रेम केल्यानंतर त्याचा अर्थ, ती भावना हळूहळू उलगडत जाते. त्यामुळे प्रेम हे अत्यंत निरागस, प्रामाणिक असल्याचं म्हटलं जातं. विशेष म्हणजे प्रेम ही कितीही छान वाटत असलं तरीदेखील ते व्यक्त करण्याची वेळ येते त्यावेळी भलेभले हात टेकतात. कारण प्रेम करणं सोपं आहे, पण ते व्यक्त करणं त्याहून कठीण. सध्याचा जमाना ऑनलाइनचा आहे. त्यामुळे एक मेसेज, फोन किंवा इमेल पाठवूनही अनेक जण आपल्या आवडत्या व्यक्तीसमोर प्रेमाची कबुली देतात. पण ज्यावेळी डेटवर जाण्याचा विचार मनात येतो. त्यावेळी अनेकांच्या मनात विविध प्रश्न घोळू लागतात. त्यामुळेच डेटवर जाताना नेमक्या कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत हे पाहुयात. म्हणूनच डेटवर जाण्यापूर्वी या टीप्स एकदा नक्की वाचा.

१. पार्टनरच्या आवड-निवड लक्षात घ्या –

जर तुम्ही पहिल्यांदाच डेटवर जात असाल तर तुमच्या पार्टनरला नेमकी कोणती गोष्टी आवडते, कोणती नाही याचा विचार करा. कारण तुमच्या पार्टनरची आवड तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. इथेच तुमचं पहिलं एम्प्रेशन पडतं.

२. डेटसाठी जागेची योग्य निवड –

डेटवर जाताना कधीही वर्दळीची जागा किंवा अत्यंत शांत असलेल्या जागेची निवड करु नका. जास्त वर्दळ किंवा गर्दी असेल तर तुम्हाला पार्टनरसोबत नीट बोलता येणार नाही. तर याच्या उलट अत्यंत निर्मनुष्य, शांत ठिकाणाची निवड केली तर समोरचा व्यक्ती तुमच्याबद्दल चुकीचा विचार करु लागेल.

३. पार्टनरला बोलू द्या –

अनेक जण डेटींगवर गेल्यानंतर समोरच्या व्यक्तीचं न ऐकता केवळ त्याला उपदेशाचे डोस किंवा स्वत:चा मोठेपणा सांगण्यात गर्क होतात. मात्र, असं न करता पार्टनरला बोलू द्या. एकमेकांशी सुसंवाद साधा.तसंच मोठ्या आवाजा बोलणं टाळा.

४. हॉटेलमध्ये एखादी ऑर्डर देण्यापूर्वी –

हॉटेलमध्ये जेवायला गेल्यास आपल्या जोडीदाराला कोणता पदार्थ आवडतोय हे विचारा. त्यानुसार, एखादा पदार्थ ऑर्डर करा. तसंच समोरच्या व्यक्तीला मद्यपान करणं आवडत नसेल तर तिच्यासमोर मुद्दाम मद्यपान करु नका. त्यामुळे तुमचं खराब इम्प्रेशन पडेल.

५. भेटवस्तू घेऊन जा –

पहिली भेट असेल तर आवर्जून पार्टनरसाठी भेटवस्तू घेऊन जा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2020 3:59 pm

Web Title: love romantic dating tips ssj 93
Next Stories
1 गुगलचा युझर्सला दणका! …तर Google Photos साठीही मोजावे लागणार पैसे
2 कढीपत्त्याची पानं खाण्याचे १० गुणकारी फायदे
3 जाणून घ्या : धनत्रयोदशीचा शुभ मुहूर्त कधी?
Just Now!
X