News Flash

भारतात पोषण आहाराचे सेवन कमी

पोषण आहाराच्या कमतरतेमुळे देशात कुपोषणाचे प्रमाणही अधिक आहे.

| September 13, 2016 01:37 am

उत्तम आरोग्यासाठी सकस आहार घेणे आवश्यक आहे, असे डॉक्टर आणि आरोग्यतज्ज्ञ सांगत असले तरी भारतात पोषण आहाराचे सेवन कमी प्रमाणात केले जाते, असे एका सव्रेक्षणातून पुढे आले आहे. अन्य दक्षिण आशियाई देशांपेक्षा भारतात पोषण आहाराची स्थिती चिंताजनक असल्याचे आरोग्यतज्ज्ञांनी सांगितले

पोषण आहाराच्या कमतरतेमुळे देशात कुपोषणाचे प्रमाणही अधिक आहे. देशाचा काही भाग वगळता सर्वच ठिकाणी कुपोषणाचे प्रमाण लक्षणीय आहे. सध्या देशात ‘कुपोषण हटाव’साठी विविध मोहिमा राबविण्यात येत असल्या तरी इतर देशांच्या तुलनेत भारताची स्थिती चांगली नसल्याचे राष्ट्रीय पोषण संस्था, इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे माजी संचालक डॉ. बी. सेसीकेरन यांनी सांगितले.

जीवनसत्त्व ए, आयोडिन यांच्यासह लोह, फॉलिक अ‍ॅसिड, बी १२ आणि ड जीवनसत्त्वांच्या कमरतेमुळे कुपोषणामध्ये वाढ होते. जन्मावेळी वजन कमी होण्याचे प्रमाण कमी झाले असले तरी दक्षिण भारतातील आणि काही उत्तर भारतातील राज्यांमध्ये याचे प्रमाण जास्त असल्याचे सेसीकेरन यांनी स्पष्ट केले.

जागतिक आरोग्य संघटनेच्या ताज्या अहवालानुसार, २.५ दशलक्ष मुलांचा प्रत्येक वर्षी कुपोषणामुळे मृत्यू होत आहे. चीनमध्ये कमी वजन असणाऱ्या पाच वर्षांखालील मुलांचे प्रमाण फक्त सात टक्के असून, भारतामध्ये हे प्रमाण ४२.५ टक्के इतके उच्च असल्याचे त्यांनी सांगितले.

(टीप : आरोग्यवार्तामधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी लोकसत्ताचा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.) 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 13, 2016 1:37 am

Web Title: low consumption nutrition diet in india
Next Stories
1 अवेळी जेवण… हृदयविकारास निमंत्रण!
2 खुल्या वातावरणात भोजन घेणे लाभदायक
3 तिबेटमधील कर्करोगरोधी औषधीला कृत्रिम पर्याय उपलब्ध