22 September 2020

News Flash

शरीरातील लिंफोसाइट कमी झाल्यास तुमचा मृत्यू अटळ

लसिका रक्तपेशी घटल्यास मृत्यूची जोखीम

शरीरातील लसिका रक्तपेशी (लिंफोसाइट) कमी झाल्या तर ती आगामी काळातील आजाराची धोक्याची सूचना असते असे एका डॅनिश संशोधनात दिसून आले आहे.

त्यांच्या मते लसिका पेशींची संख्यापातळी कमी झाली तर कुठल्याही रोगाने मृत्यू ओढवण्याची जोखीम साठ टक्क्य़ांनी वाढते. लिंफोपेनिया या अवस्थेत लसिका रक्तपेशी कमी होतात. अनेकदा रक्तचाचण्यातून ही गोष्ट समजत असतानाही त्याक डे होणारे दुर्लक्ष हे घातक ठरते. त्यासाठी रुग्णांना पुढील सल्ला घेण्याची सूचना दिली जात नाही. त्यामुळे पुढील आजारांची धोक्याची घंटाही समजत नाही.

डेन्मार्कमधील कोपनहेगन युनिव्हर्सिटी रुग्णालयातील स्टिग बोजनसन यांनी म्हटले आहे,की लिंफोपेनिया आजाराच्या संशोधनात काही रुग्ण सहभागी झाले होते, पण त्यांच्यातील जोखीम जास्त दिसून आली. वयपरत्वे होणाऱ्या आजारांसह सर्वच बाबतीत या रुग्णांचा धोका वाढलेला असतो. कॅनेडियन मेडिकल असोसिएशनच्या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या या संशोधनात डॅनिश वंशाच्या २० ते १०० वयोगटातील १०८१३५ व्यक्तींचा अभ्यास क रण्यात आला.

२००३ ते २०१५ या काळात कोपनहेगन लोकसंख्या अभ्यासाअंतर्गत त्यांची नोंदणी करण्यात आली होती. कुठल्याही कारणाने होणाऱ्या मृत्यूची जोखीम लसिका पेशी कमी झाल्याने १.६ पट वाढते. कर्करोग, हृदयरोग, श्वसनरोग, संसर्ग यामुळे मरण्याची जोखीम २.८ पट वाढते. या काळात एकूण १०३७२ जण मरण पावले. वय वाढते तशी लसिका पेशींची संख्या कमी होते त्यामुळे माणूस अशक्त बनत जातो. त्यामुळे यापुढे डॉक्टरांनी रक्त तपासणीचे अहवाल बघताना लसिका पेशींच्या संख्येवर लक्ष केंद्रित करण्याची गरज प्रतिपादन करण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2020 8:10 pm

Web Title: low levels of lymphocyte blood cells associated with high risk of death mppg 94
Next Stories
1 Sony Walkman चं पुनरागमन, वाय-फाय आणि फास्ट चार्जिंगचा सपोर्टही
2 प्रोस्टेट कर्करोग निदानात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर
3 ‘सॅमसंग’चा ढासू स्मार्टफोन , दिवसभर टिकणार अवघ्या 30 मिनटांची चार्जिंग
Just Now!
X