News Flash

‘व्हिटॅमिन डी’च्या कमतरतेमुळे लहानमुलांना रक्ताक्षयाचा धोका!

लहानमुलांमध्ये 'व्हिटॅमिन डी'च्या कमतरेतेमुळे रक्ताक्षयाचा धोका निर्माण होत असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.

| October 28, 2013 12:08 pm

लहानमुलांमध्ये ‘व्हिटॅमिन डी’च्या कमतरेतेमुळे रक्ताक्षयाचा धोका निर्माण होत असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. नव्याने अभ्यास करण्यात आलेल्या माहितीनुसार, लहानमुलांच्या शरिरातील ‘व्हिटॅमिन डी’चे प्रमाण ३० नॅनो ग्रॅमपेक्षा कमी असल्यास त्यांना रक्तक्षयाचा धोका संभवतो. त्यामुळे ‘व्हिटॅमिन डी’युक्त पदार्थांचा आहार लहानमुलांनी जास्त करणे गरजेचे असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. तसेच शुभ्रवर्णीय मुलांपेक्षा कृष्णवर्णीय मुलांमध्ये ‘व्हिटॅमिन डी’चे प्रमाण कमी असल्याचेही आढळून आले आहे. जेवढे व्हिटॅमिन डीचे शरिरातील प्रमाण कमी तेवढा रक्तक्षयाचा धोका अधिक असल्याचेही समोर आले आहे.  

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 28, 2013 12:08 pm

Web Title: low vitamin d levels raise anaemia risk in children
टॅग : Lifestyle News
Next Stories
1 आरोग्यदायी तूप
2 हात धुतल्याने तुम्ही होता सकारात्मक
3 आनंदाच्या भरात ग्राहक करतात खूप खरेदी
Just Now!
X