बाजारपेठेवर तरुणपिढीच वर्चस्व आहे. हे तरुण सातत्याने स्मार्टफोनच्या शोधात असतात. जास्त फीचर्स आणि परवडण्याजोग्या किमतीत त्यांना तो हवा असतो. ल्युमिया ५२० च्या यशावरच ल्युमिया ५३० ची जडणघडण करण्यात आली आहे. या क्षेत्रात स्थान निश्चित करण्यासाठी हे महत्त्वपूर्ण पाऊल आहे. अभिनव डिझाईन, ८.१ विंडो फोन आणि एकमेवद्वितीय ल्युमिया अनुभवामुळे ल्युमिया ५३० थ्रीजी डय़ुएल सीम हा स्मार्टफोन बनला आहे, असे नोकिया इंडियाचे बीटूबीचे संचालक सुरेश वेदुला यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
मायोक्रोसॉफ्ट डिव्हाईसने मंगळवारी ल्युमिया ५३० डय़ुएल सीम हा आपार्तयत सर्वाधिक परवडण्याजोगा मोबाईल फोन बाजारात दाखल केला आहे. मायक्रोसॉफ्ट आणि ल्युमिया तंत्रज्ञानाचा समावेश असणारा हा स्मार्टफोनचा अनुभव देतो. या फोनचे कव्हर शेल्स बदलता येऊ शकणाऱ्या गडदरंगी, गडद हिरवा, गडद करडा व पांढऱ्या स्टायलिश रुंगामध्ये उपलब्ध आहेत. कमी किमतीच्या ल्युमिया फोनमुळे विंडोज फोन आता खऱ्या अर्थाने समान्यांपर्यंत पोहोचला आहे. मायक्रोसॉफ्टच्या सेवा परवडण्यायोग्य मोबाईल फोनमुळे आता अधिकाधिक लोकांना जलदगती अनुभवता येणार आहे. यामध्ये मायक्रोसॉफ्ट सेवांचे एकात्मीकरण आणि डय़ुएल सीम फीचर आहे, असे वेदुला म्हणाले. यावेळी कंपनीचे कार्यक्रम व्यवस्थापक शरद यांनी या स्मार्टफोनचे सादरीकरण केले.