फुप्फुसात खोलवर झालेल्या जखमांची तपासणी करू शकेल, असे अगदी केसाच्या आकाराचे साधन (प्रोब) शास्त्रज्ञांनी विकसित केले आहे. हानी झालेल्या उतींची विविध दृष्टीने तपासणी करणे त्याद्वारे शक्य आहे. या साधनाच्या साहाय्याने न्यूमोनियासारख्या रोगांच्या विविध अवस्थांची माहिती मिळवणे शक्य होईल, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

जखमा तपासण्यासाठी तयार केलेल्या या लघुसाधनामध्ये ऑप्टिकल फायबरचा वापर केलेला असतो. या ऑप्टिकल फायबरचा व्यास सुमारे ०.२ मिलिमीटर इतका असतो. त्यामध्ये १९ संवेदक (सेन्सर) बसविलेले असतात. याबाबतची माहिती ‘सायंटिफिक रिपोर्टस्’ या पत्रिकेत प्रसिद्ध झाली आहे.

Operation Nanhe Farishte 1064 children were rescued
‘ऑपरेशन नन्हे फरिश्‍ते’ काय आहे माहितीये का? मायेला मुकलेल्या चिमुकल्यांना…
stock market, 3 7 crore dmat accounts
सरलेल्या आर्थिक वर्षात ३.७ कोटी डिमॅट खात्यांची भर
पाणी किंवा चहात फक्त १५ मिली ‘हे’ द्रव घातल्यास कंबरेचा घेर व वजन होईल कमी; नवीन अभ्यास काय सांगतो?
cabbage for weight loss
तुमच्या घरी कायम असणारी ‘ही’ भाजी वाढलेले वजन झपाट्याने करेल कमी; लगेच करा रोजच्या जेवणात समावेश

या साधनातील ऑप्टिकल फायबरला जोडलेल्या संवेदकांपैकी प्रत्येक संवेदक तेथील उतीसंबंधी वेगळी माहिती पुरवितो. यात त्या उतीमधील आम्लता, ऑक्सिजनचे प्रमाण आदींचा समावेश आहे. या प्रकारच्या माहितीमधून संबंधित रोगाच्या संक्रमणाला शरीर कसे प्रतिसाद देत आहे, याचा अंदाज बांधता येतो.

इंग्लंडमधील एडिनबर्ग विद्यापीठ आणि हेरिओट-वॅट विद्यापीठातील संशोधकांनी हे साधन विकसित केले आहे. या तंत्रामुळे, आतापर्यंत शरीराच्या ज्या भागातील उतींच्या अवस्थेची माहिती मिळविणे शक्य नव्हते, त्या भागांतील अचूक माहिती मिळविणेही शक्य होणार आहे.

जगभरातच फुप्फुसांचे रोग हे मृत्यू आणि विकलांगतेचे प्रमुख कारण आहे. फुप्फुसांचे रोग बरे करण्यासाठी आधुनिक उपचार केले जात असले, तरी फुप्फुसांत जखमा झालेल्या किंवा न्यूमोनिया झालेल्या रुग्णांचा रोग कसा बळावत जातो, याबद्दल सध्या फारशी माहिती उपलब्ध नाही. हे तंत्र विकसित करणाऱ्या संशोधकांच्या म्हणण्यानुसार, त्याद्वारे फुप्फुसाच्या खोल भागातील उतींमधील बारीकसारीक बदल लक्षात येतील. त्यामुळे विशेषत: अतिदक्षता विभागातील किंवा व्हेंटिलेटरवरील रुग्णांवर योग्य उपचार करणे शक्य होईल.