News Flash

लिची खाण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे

बाहेरील कवच गुलाबी रंगाचे तर आतील गर मात्र पांढरे रसाळ, मधुर व अर्धपारदर्शी

अतिशय मधुर, रसाळ. उन्हाळ्यात जिभेला शीतलता देणारे फळ. हे देखील फळ मूळचे दक्षिण चीनमधले. बाहेरील कवच गुलाबी रंगाचे तर आतील गर मात्र पांढरे रसाळ, मधुर व अर्धपारदर्शी. या फळांमध्ये कार्बोहाईड्रेट, व्हिटॉमिन ए, व्हिटॉमिन सी, बी कॉम्प्लेक्स, पोटॅशियम, कल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फॉरस, आयर्न आणि मिनरल्स यांसारखे पोषक घटक असल्याने शरीर स्वस्थ राहण्यास मदत होते. मात्र याचे अतिरिक्त सेवन करणे टाळा. मे ते ऑक्टोबर ह्या दरम्यान लीची बाजारात मुबलक प्रमाणात उपलब्ध असते. भारतात बिहार व पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक लागवड केली जाते. पाहूयात लीची खाण्याचे काय आहेत फायदे…

कोणी खावे ?
लीची हे शक्तिवर्धक, रक्ताभिसरण वाढवणारे, रक्ताशी निगडीत असलेले विकार काढून टाकणारे फळ आहे. त्यातील रासायनिक गुणधर्मामुळे पचनक्रियासंवर्धक तसेच निद्रानाशमुक्त करणारे आहे. भारतात लीचीच्या ‘बी’पासून बनवलेला चहा वेदनाशामक म्हणून उपयोगात आणला जातो. ह्या फळामध्ये पोटॅशियम व तांबे ही खनिजे जास्त प्रमाणत असल्याने हृदयविकार तसेच यकृताच्या आजारावर गुणकारी आहे. या फळाला त्वचेचा खास दोस्त मानला जातो, ते त्यातील ओलीगोनॉल रसायनामुळे. या रसायनामुळे सूर्यापासून येणाऱ्या अतिनील किरणांपासून त्वचेचे संरक्षण होते.

लिचीत बीटा कॅरोटीन आणि ओलीग्रोनोल असते. त्यामुळे हृदयाचे आरोग्य राखले जाण्यास मदत होते. हृदयासंबंधित समस्या असलेल्यानांनी आहारात लिचीचा समावेश अवश्य करावा. वजन नियंत्रित राहण्यास मदत होते. वजन कमी करण्यासाठी लिचीचा आहारात जरुर समावेश करा. सकाळच्या वेळेस लिची खाल्याने पोट भरल्यासारखे वाटते आणि भूक कमी लागते.

कोणी खाऊ नये?
लीची हे फळ गोड असल्याने मधुमेहींनी टाळावे . तसेच सकाळी उपाशीपोटी या फळाचे सेवन करु नये..

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 18, 2020 3:49 pm

Web Title: lychee fruit health benefits nck 90
Next Stories
1 Paytm युझर्सच्या पैशांचं काय होणार?; गुगलच्या कारवाईनंतर कंपनीची पहिली प्रतिक्रिया
2 SBI ग्राहकांसाठी महत्वाची बातमी; ATM मधून पैसे काढण्यासाठी आजपासून ‘हा’ नवीन नियम
3 PayTM वर गुगलची कारवाई, Play store वरुन Application हटवले
Just Now!
X