महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. अर्थात महावितरणमध्ये नोकरी करण्याची सुवर्ण संधी आहे.  महावितरणद्वारे 5000 विद्युत सहाय्यक तर 2000 उपकेंद्र सहाय्यक अशा एकूण 7000 जागांसाठी अर्ज मागवण्यात आलेले आहेत. अर्ज करण्याच्या प्रक्रियेला 13 जुलैपासून सुरूवात झालीये, 26 जुलै अर्ज करण्याची अखेरची तारीख आहे.

अर्ज करणारा उमेदवार किमान 12 वी पास किंवा आटीआय उत्तीर्ण किंवा राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषदेकडून हे प्रमाणपत्र दिलं जातं. याशिवाय उमेदवाराचं वय 18 ते 27 या दरम्यान असणं गरजेचं आहे. कंत्राटी पद्धतीची ही भरती असून यामध्ये पात्र उमेदवाराला तीन वर्षांच्या कंत्राटावर सेवा करण्याची संधी मिळेल. महावितरणने याबाबतची जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

पगार किती – 

विद्युत सहाय्यक पदांसाठी निवड झालेल्यांना पहिल्या वर्षी 7,500 रुपये, दुसऱ्या वर्षी  8,500 रुपये आणि तिसऱ्या वर्षी 9,500 रुपये दरमहा मानधन मिळेल. तर  उपकेंद्र सहाय्यक पदांसाठी निवड झालेल्यांना पहिल्या वर्षी 9,000 रुपये, दुसऱ्या वर्षी 10,000 रुपये आणि तिसऱ्या वर्षी 11,000 रुपये दरमहा मानधन मिळेल.

कोणत्या पदासाठी किती जागा?

विद्युत सहाय्यक – 5000 (विविध आरक्षणानुसार जागांचं वितरण)

उपकेंद्र सहाय्यक – 2000 (विविध आरक्षणानुसार जागांचं वितरण)

नोकरीचे ठिकाण – 

संपूर्ण महाराष्ट्र

वयाची अट –

वय 18 ते 27 वर्ष