महाराष्ट्र पोलीस विभागामध्ये “पोलीस शिपाई चालक आणि सशस्त्र पोलीस शिपाई” पदासाठी १८४७ जागांवर भरती होणार आहे. या पदभरतीची जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ डिसेंबरपर्यंत आहे.
पोलीस शिपाई चालकासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवार बारावी उत्तीर्ण व हलके वाहन[LMV -TR] चालविण्याचा वैध परवाना असावा. नक्षलग्रस्थ भागाताली उमेदवारांना ही अट सातवी उत्तीर्ण अशी आहे. सशस्त्र पोलीस शिपाई [SRPF] या पदासाठी अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवार बारावी उत्तीर्ण असल्यास पात्र ठरेल.
शारिरीक पात्रता :-
उंची :- पुरुष :- १६५cms / महिला :- १५८cms
छाती :- पुरुष :- ७९ cm न फुगवता
– नक्षलग्रस्थ उमेदवारांना छातीच्या मोजमापाची आवश्यकता नाही
वयोमर्यादा :-
दि .३१/१२/२०१९ रोजी
पोलीस शिपाई चालक:- १९ ते २८ वर्षे
सशस्त्र पोलीस शिपाई:- १८ ते २५ वर्षे
परीक्षा फी :-
खुला प्रवर्ग :- Rs. ४५०/-
मागासवर्गीय प्रवर्ग / अनाथ मुले:- Rs. ३५०/-
अर्ज करण्यासाठी इथं क्लिक करा
पोलीस शिपाई चालक पदाच्या माहितीसाठी इथं क्लिक करा
सशस्त्र पोलीस शिपाई [SRPF] पदाच्या माहितीसाठी इथं क्लिक करा
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 2, 2019 11:52 am