News Flash

खूशखबर! पोस्टात १,३७१ पदांसाठी भरती, पगार ६९ हजार रुपये

१,३७१ पदांसाठी भरती, तरुणांना नोकरीची संधी

लाखो लोकांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या आहेत. अर्थचक्र अजूनही पूर्णपणे रुळावर आलेले नाही. (संग्रहित छायाचित्र)

Maharashtra Postal Circle Recruitment 2020 : करोना महामारीमध्ये अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. महामारीमुळे जगात आर्थिक मंदीचं संकट उभं राहिलं आहे. मंदीमध्ये पोस्टात नोकरी करण्याची संधी आली आहे. भारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र पोस्टल सर्कलमध्ये पोस्टमन आणि मल्टीटास्किंगच्या १३०० पेक्षा जास्त जागांवर भरती निघाली आहे. भारतीय डाक विभागानं याबाबतची जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

इच्छुक उमेदारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवार ३ नोव्हेंबरपर्यंत अर्ज दाखल करु शकतात. पदांबाबातच्या आधिक माहितीसाठी भारतीय डाक विभागाच्या संकेतस्थळावर भेट द्या.

कोणत्या पदांसाठी किती जागा?

पोस्टमन (PM) – 1,029 पदे
मेल गार्ड (MG) – 15 पदे
मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) (ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर) – 32 पदे
मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) (सबऑर्डिनेट ऑफिसर) – 295 पदे

एकूण पदे – १,३७१

वेतन श्रेणी-
▪️ पोस्टमन / मेल गार्ड – वेतनश्रेणी – 3 (21,700 ते 69,100 रुपये.)
▪️ मल्टी टास्किंग स्टाफ – वेतनश्रेणी – 1 (18,000 ते 56,900)

वयोमर्यादा-
▪️ पोस्टमन आणि मेल गार्ड- 18 ते 27 वर्षे
▪️ मल्टी टास्किंग स्टाफ- 18 ते 25 वर्षे
▪️ SC/ST/PWD प्रवर्गांसाठी वयोमर्यादेत सवलत

शैक्षणिक पात्रता-
▪️ मान्यताप्राप्त बोर्डातून बारावी उत्तीर्ण.
▪️ मल्टी टास्किंग स्टाफ पदासाठी मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी उत्तीर्ण.
▪️ मराठी भाषेचे ज्ञान, किमान दहावीपर्यंतचे शिक्षण मराठी माध्यमातून हवे.
▪️ संगणकाचे ज्ञान आवश्यक.
▪️ पोस्टमन पदांसाठी दुचाकीचा वाहन परवाना आवश्यक. परवाना नसल्यास 2 वर्षे मुदतीत तो मिळवण्याची अट. दिव्यांगांना सवलत.

अर्ज प्रक्रिया व फी-
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शुल्कही ऑनलाईन भरायचे आहे. प्रति पोस्ट 100 रुपये ऑनलाईन अर्जासाठी आणि 400 रुपये परीक्षा शुल्क असे एकूण 500 रुपये शुल्क आहे. आरक्षित प्रवर्ग आणि महिलांसाठी परीक्षा शुल्क माफ आहे.

जाहिरात
इच्छुक उमेदवारांनी https://www.maharashtrapost.gov.in/ किंवा  www.indiapost.gov.in/VAS/Pages/Recruitment/1582_30_2020.pdf या लिंकवर क्लिक करून सविस्तर माहितीसाठी पीडीएफ डाऊनलोड करावी. अर्ज प्रक्रिया आज ५ ऑक्टोबर पासून सुरू होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 6, 2020 9:47 am

Web Title: maharashtra postal circle invites application for 1371 postman mts posts check notification and details here nck 90
टॅग : Job
Next Stories
1 Poco C3 आज होणार लाँच, किंमत १० हजारांपेक्षा कमी
2 कारवाई करणाऱ्या गुगलला Paytm चं आव्हान; लॉन्च केलं स्वत:चं अ‍ॅप स्टोअर
3 मेथीचे लाडू खा आणि कफ, सर्दीपासून मिळवा आराम
Just Now!
X