01 June 2020

News Flash

महाराष्ट्र : 10 वी पास तरुणांना पोस्टात नोकरीची संधी, तब्बल 3650 पदांसाठी भरती

नोकरीच्या शोधात असणाऱ्या राज्यातील तरुणांसाठी महत्त्वाची बातमी

(प्रतिकात्मक छायाचित्र)

नोकरीच्या शोधात असणाऱ्या राज्यातील तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र पोस्टल सर्कलमध्ये तब्बल ३६५० जागांसाठी भरती प्रक्रिया होत असून या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची अट केवळ १०वी पास इतकीच आहे. नवी मुंबई, सोलापूर, पुणे, अहमदनगर, ठाणे या ठिकाणांवर ३६५० जागांसाठी भरती प्रक्रिया होणार आहे.

यासाठी अर्जदार उमेदवाराचं वय किमान १८ वर्षे आणि अधिकाधिक ४० वर्षांच्या दरम्यान असावं, एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत ५ वर्षांपर्यंत वयाची अट शिथिल करण्यात आली आहे. तर, इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठीही ३ वर्षांपर्यंत वयाची अट शिथिल आहे. सर्वसाधारण प्रवर्ग, इतर मागासवर्गीय प्रवर्ग आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारांसाठी परीक्षा फी १०० रुपये इतकी आहे. तर एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांना परीक्षा फी द्यावी लागणार नाही. उमेदवार किमान १० वी पास असणं बंधनकारक असून अर्जदाराला कम्प्युटरचं आणि स्थानिक भाषेचं (मराठी) ज्ञान आवश्यक आहे.

ब्रांच पोस्ट मास्टर, असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर, आणि ग्रामीण डाक सेवक पदांसाठी ही भरती होत असून अधिकृत संकेतस्थळावर एक नोव्हेंबरपासून अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवातही झाली आहे. ३० नोव्हेंबर २०१९ अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 4, 2019 10:12 am

Web Title: maharashtra postal circle recruitment 2019 10th pass apply online for 3650 gds posts sas 89
Next Stories
1 “मजा येतेय”; संजय राऊतांचा भाजपाला ट्विटवरुन टोला
2 “पुन्हा निवडणुकीसाठी तयार राहा”; भाजपा नेत्याचा कार्यकर्त्यांना आदेश
3 “…कारण उद्धव ठाकरेंवर आमचा आहे डोळा”; आठवलेंची शिवसेनेला कवितारूपी ऑफर
Just Now!
X