22 October 2019

News Flash

स्पोर्ट युटिलिटी वाहनासाठी महिंद्रा-फोर्डची हातमिळवणी

भारत व इतर उदयोन्मुख बाजारपेठांसाठी उत्पादनाच्या विकासावर लक्ष केंद्रित करण्याचा दोन्ही कंपन्यांमध्ये धोरणात्मक करार,

 

महिंद्रा समूह आणि फोर्ड मोटर कंपनीने भारतात आपली धोरणात्मक भागिदारी आणखी बळकट करण्याचे ठरविले आहे. याचाच एक भाग म्हणून या दोन्ही कंपन्या एक मध्यम आकाराचे नवे स्पोर्ट युटिलिटी वाहन संयुक्तरित्या विकसीत करणार आहेत. याबाबतचा करार उभय कंपन्यांनी नुकताच केला.

या करारान्वये दोन्ही कंपन्या भारत व अन्य उदयोन्मुख देशांसाठी मापदंड ठरणारे एक विशेष वाहन विकसीत करणार आहेत. महिंद्र आणि फोर्ड यांच्यात हे धोरणात्मक सहकार्य सप्टेंबर 2017 पासूनच सुरू झाले. ’पॉवरट्रेन शेअरींग’ची आणि ’कनेक्टेड कार सोल्युशन्स’ काढण्याची घोषणा ऑक्टोबर 2018 मध्ये त्यांनी केली होती. हेच त्यांचे आपसातील सहकार्य नव्या कराराने अधिक बळकट झाले आहे. नवीन मिड-साईझ स्पोर्ट्स युटिलिटी व्हेईकल (सी-एसयूव्ही) मध्ये महिंद्रचे सध्याचे उत्पादन प्लॅटफॉर्म आणि पॉवरट्रेन असेल. त्याद्वारे वाहनाची अभियांत्रिकी आणि व्यावसायिक कार्यक्षमता वाढविण्यात येणार आहे.

’महिंद्र अन्ड महिंद्र लिमिटेड’चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. पवन गोयंका म्हणाले, “आम्ही केलेल्या महत्त्वपूर्ण प्रगतीमुळे आणि 2017 मध्ये फोर्डबरोबरच्या आमच्या धोरणात्मक भागिदारीच्या घोषणेनंतर निर्माण झालेल्या सृजनशीलतेमुळे मला खूप आनंद झाला आहे. आजच्या घोषणेमध्ये आमच्या दोघांच्या सहकार्याचे आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. दोन्ही कंपन्या अनेक क्षेत्रांमध्ये संयुक्त विकासासाठी एकत्र आलेल्या असून यापुढेही एकसमान प्लॅटफॉर्मचा वापर करुन उत्पादनांचा विकास करण्यासाठी एकत्र कार्य करत राहतील. यामुळे उत्पादन विकास खर्च कमी होईल आणि दोन्ही कंपन्यांचा आर्थिक फायदा होईल.”

फोर्ड कंपनीच्या नवीन व्यवसाय, तंत्रज्ञान व धोरण विभागाचे अध्यक्ष जिम फर्ली या प्रसंगी म्हणाले, ’’आजच्या नव्या कराराच्या घोषणेमुळे आम्ही महिंद्राबरोबरची आमची चालू भागीदारी मजबूत करीत आहोत. तसेच भारतासारख्या महत्त्वपूर्ण उदयोन्मुख बाजारपेठेत आमची स्पर्धात्मकताही वाढवीत आहोत. “फोर्ड’चे तांत्रिक नेतृत्व आणि ’महिंद्र’चे कार्यान्वयाचे व उत्पादनाचे यशस्वी ठरणारे कौशल्य यांच्या संयुक्त विद्यमाने एकत्रितपणे एक वाहन विकसीत करण्यात येत आहे, जे भारतीय ग्राहक तसेच इतर उदयोन्मुख बाजारपेठांच्या अपेक्षा पूर्ण करेल.”

First Published on April 22, 2019 5:55 pm

Web Title: mahindra and ford sign agreement to co develop a midsize sports utility vehicle