30 November 2020

News Flash

महिंद्राची दमदार एसयूव्ही Bolero झाली 35 हजारांपर्यंत महाग, जाणून घ्या नवीन किंमत

महिंद्राची लोकप्रिय एसयूव्ही Bolero झाली महाग

देशातील प्रमुख वाहन निर्माता कंपनी महिंद्राची लोकप्रिय एसयूव्ही Bolero आता महाग झाली आहे. कंपनीने या एसयूव्हीच्या किंमतीत वाढ केली आहे. नवीन बोलेरो मार्च 2020 मध्ये उत्तम स्टायलिंग,अपडेटेड इंटीरिअर आणि बीएस6 इंजिनसह लाँच झाली होती. लाँचिंगवेळी 7.98 लाख रुपये ते 8.99 लाख रुपये (एक्स-शोरुम) इतकी या गाडीची किंमत होती. पण आता कंपनीने या एसयूव्हीच्या किंमतीत 35,000 रुपयांपर्यंत वाढ केली आहे.

किंमतीत झालेल्या वाढीनंतर आता बोलेरोच्या बेसिक व्हेरिअंटची एक्स-शोरुम किंमत 8 लाख रुपये झाली आहे. 2020 महिंद्रा बोलेरो BS4, BS6 आणि BS6 (O) अशा तीन व्हेरिअंटमध्ये येते. मार्चमध्ये तिन्ही व्हेरिअंटची किंमत अनुक्रमे 7.98 लाख रुपये, 8.64 लाख रुपये आणि 8.99 लाख रुपये होती. पण आता किंमतीत वाढ झाल्याने बेसिक-व्हेरिअंटची(BS4) एक्स-शोरुम किंमत 8 लाख रुपये, मिड- व्हेरिअंटची (BS6) किंमत 8.66 लाख रुपये आणि टॉप व्हेरिअंटची BS6 (O) किंमत 9.01 लाख रुपये झाली आहे. सर्व एक्स-शोरूम किंमती आहेत.

(Mahindra ने दिली ‘गुड न्यूज’! स्वस्त झाली कंपनीची दमदार SUV, किंमतीत घसघशीत कपात)

इंजिन आणि फीचर्स :-
महिंद्रा बोलेरो 2020 मध्ये 1.5-लिटर डिझेल इंजिन आहे. 5-स्पीड गिअरबॉक्स असलेलं हे इंजिन 75 bhp पॉवर आणि 210 Nm टॉर्क निर्माण करतं. 60-लिटर क्षमतेची पेट्रोल टाकी या एसयूव्हीमध्ये आहे. बोलेरोमध्ये नवीन ग्रिल, नवीन फ्रंट बंपर आणि अपडेटेड हेडलॅम्प आहेत. मागील बाजूला नवीन टेललॅम्प आणि बूट गेटसाठी नवीन डुअर हँडल दिले आहे. इंटीरिअरमध्ये Aux आणि USB सपोर्टसह म्युझिक सिस्टिम मिळेल. कारच्या सर्व व्हेरिअंट्समध्ये डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर आहे. पण, स्टेटिक बेंडिंग हेडलॅम्प, फॉग लॅम्प्स आणि रिअर पॅसेंजर एअरबॅग्स केवळ टॉप व्हेरिअंटमध्ये आहे. गाडीमध्ये बसण्यासाठी एक तिसरी लाइनही आहे. पण या लाइनचे सीट्स साइड फेसिंग असतात, शिवाय यामध्ये रिअर AC व्हेंट्स मिळत नाही. नवीन बोलेरोमध्ये सुरक्षेसाठी ड्युअल एअरब२ग्स, हाय स्पीड अलर्ट, ड्रायव्हर व को-ड्रायव्हर सीटबेल्ट रिमाइंडर आणि रिअर पार्किंग सेन्सर्स यांसारखे फीचर्स आहेत.

(स्वस्त झाली Mahindra ची जबरदस्त SUV, फक्त ₹5000 मध्ये करता येईल बुकिंग)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 31, 2020 4:29 pm

Web Title: mahindra bolero prices hiked now costlier than the modern xuv300 check new price sas 89
Next Stories
1 सर्दी-खोकला झाल्यास या पद्धतीनं करा कांद्याचा उपयोग, लगेच व्हाल ठणठणीत
2 399 रुपयांत अनलिमिटेड इंटरनेट, नवीन ग्राहकांना 30 दिवस फ्री ट्रायल; Jio Fiber ने लाँच केला स्वस्त प्लॅन
3 OnePlus चा ‘स्वस्त’ स्मार्टफोन ‘फ्लॅश-सेल’मध्ये खरेदी करण्याची संधी, जाणून घ्या डिटेल्स
Just Now!
X