Mahindra ने आपली ऑफ-रोड एसयुव्ही Thar चं लिमिटेड एडिशन मॉडल लाँच केलं आहे. स्टँडर्ड थारपेक्षा या लिमिटेड एडिशन कारची किंमत 50 हजार रुपये अधिक आहे. Mahindra Thar 700 या नव्या एसयुव्हीची एक्स-शोरुम किंमत 9.99 लाख रुपये आहे. कंपनीने अशाप्रकारच्या केवळ 700 गाड्यांची निर्मिती केली असून सध्याच्या ‘थार’ कारसाठीच्या या अखेरच्या 700 गाड्या असणार आहेत. यानंतर कंपनी नवीन-जनरेशन ‘थार’ लाँच करणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘महिंद्रा थार 700’ मधील सर्वाधिक आकर्षक बाब म्हणजे फ्रंट फेंडरच्या वर असलेला स्पेशल बॅज. या बॅजवरती महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांची स्वाक्षरी आहे. ही लिमिटेड एडिशन कार नेपोली ब्लॅक शेड आणि अॅक्वा मरीन अशा दोन रंगांमध्ये उपलब्द आहे. याशिवाय अन्य बदलांबाबत सांगायचं झाल्यास या स्पेशल एडिशन थारमध्ये ग्रिलवरती ब्लॅक फिनिश, साइड आणि बोनटवरती स्टिकर, नवीन स्टायलिश 5-स्पोक अॅलॉय व्हिल्स आणि बंपरवर सिल्वर फिनिश आहे. कारच्या अंतर्गत बाजूमध्ये आसनांसाठी नवीन आकर्षक लेदर सीट कव्हर आहेत.

‘स्पेशल एडिशन थार 700’ मध्ये एबीएस –
1 एप्रिलपासून लागू झालेल्या नव्या सुरक्षाविषयक नियमांनुसार या कारमध्येही अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टिम अर्थात एबीएस हे फीचर देण्यात आलं आहे. याशिवाय या ऑफ-रॉड एसयुव्हीमध्ये अजून कोणताही मॅकेनिकल बदल करण्यात आलेला नाही. स्पेशल एडिशन थार केवळ 2.5-लिटर CRDe 4-सिलिंडर, टर्बोचार्ज्ड डिझेल इंजिनमध्येच उपलब्ध आहे. हे इंजिन 105 bhp ची ऊर्जा आणि 247 Nm पीक टॉर्क जनरेट करतं. यात 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आहे.

बुकिंग सुरू –
लिमिटेड एडिशन महिंद्रा थार 700 साठी बुकिंग देखील सुरू झाली आहे. कंपनीच्या डिलर्सकडे आणि अधिकृत संकेतस्थळावरुन बुकिंग सुरू आहे. यानंतर महिंद्रा नेक्स्ट जनरेशन थार बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. कंपनीने यासाठी चाचणी देखील सुरू केली आहे. पुढील वर्षी 2020 च्या ऑटो-एक्स्पोमध्ये नेक्स्ट जनरेशन थार सादर केली जाण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahindra thar 700 launched know price and specifications sas
First published on: 19-06-2019 at 12:06 IST