News Flash

BS-6 इंजिनसह Mahindra XUV 300 झाली लाँच, किंमतीत बदल

बीएस-6 इंजिनसह लाँच करण्यात आलेली Mahindra XUV 300 ही 'महिंद्रा'ची पहिली एसयूव्ही

Mahindra ने आपली सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही XUV300 बीएस-6 इंजिनसह लाँच केली आहे. ‘महिंद्रा’ने एप्रिल 2020 पासून लागू होत असलेल्या बीएस-6 मानकांसह वाहनं अपग्रेड करण्यास सुरूवात केली आहे. या कारचं केवळ पेट्रोल व्हर्जन बीएस-6 इंजिनमध्ये अपग्रेड करुन बाजारात उतरवण्यात आलं आहे.

BS6 Mahindra XUV300 ची एक्स-शोरूम किंमत 8.30 लाख ते 11.84 लाख रुपयांदरम्यान आहे. बीएस-4 च्या तुलनेत नव्या गाडीच्या विविध व्हेरिअंट्सची किंमत जवळपास 20 हजार रुपये अधिक आहे. बीएस-6 इंजिनसह लाँच करण्यात आलेली Mahindra XUV 300 ही ‘महिंद्रा’ची पहिली एसयूव्ही आहे.

महिंद्रा एक्सयूव्ही 300 आता BS-6, 1.2-लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिनसह उपलब्ध आहे. हे इंजिन 5,000 rpm वर 110 bhp ची ऊर्जा आणि 2,000-3,500 rpm वर 200 Nm पीक टॉर्क निर्माण करतं. 6-स्पीड मॅन्युअल ट्रांसमिशनचा पर्याय यात आहे. पेट्रोल इंजिनशिवाय ही एसयूव्ही 1.5-लीटर, टर्बोचार्ज्ड डीझेल इंजिनमध्येही उपलब्ध आहे. हे इंजिन 3,750 rpm वर 115 bhp ची ऊर्जा आणि 1,500-2,500 rpm वर 300 Nm पीक टॉर्क निर्माण करतं. डिझेल इंजिनसह 6-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड एएमटी गिअरबॉक्सचा पर्यायही आहे. डिझेल इंजिन सध्या केवळ बीएस-4 मानकांसह उपलब्ध आहे.

आणखी वाचा- Seltos ची जबरदस्त ‘क्रेझ’, सलग दुसऱ्या महिन्यात ठरली नंबर-1 SUV

फीचर्स –
महिंद्राने आपली ही सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही फेब्रुवारी 2019 मध्ये लाँच केली होती. ही एसयूव्ही चार व्हेरिअंट (W4, W6, W8 आणि W8 (O)) मध्ये उपलब्ध आहे. एक्सयूव्ही 300 मध्ये ड्युअल एअरबॅग्स, एबीएस, सर्व व्हिल्सला डिस्क ब्रेक, एलईडी टेल लाइट्स आणि चारही पावर विंडो यांसारखे फीचर्स स्टँडर्ड म्हणजे बेस व्हेरिअंटमध्ये आहेत. W8 व्हेरिअंटमध्ये ड्युअल-झोन ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, 7-इंच टचस्क्रीन इंफोटेन्मेंट सिस्टिम, रिव्हर्स कॅमेरा आणि क्रूज कंट्रोल यांसारखे फीचर्स मिळतील. टॉप व्हेरिअंट W8 (O) मध्ये फ्रंट पार्किंग सेंसर, 17-इंच डायमंड-कट अॅलॉय व्हिल्स, सनरूफ आणि 7-एअरबॅग्स आहेत. याशिवाय कारमध्ये लेदर सिटे, ड्युअल टोन इंटिरिअर, अॅडजस्टेबल बूट फ्लोर, मल्टिपर्पज सेंटर कंसोल बॉक्स, मागे-पुढे कप होल्डर, फ्रंट स्टोरेज ट्रे, चारी दरवाजांवर बोटल होल्डरसारखी फीचर देण्यात आली आहेत.

एक्सयूव्ही 300 पेट्रोल किंमत –
W4 – 8.30 लाख रु
W6 – 9.15 लाख रु
W8 – 10.60 लाख रु
W(O) – 11.84 लाख रु

सध्या प्रदूषण हा आपल्या देशासमोरील मोठा प्रश्न आहे. शहरांतील प्रदूषण वाढीसाठी इतर घटकांसह वाहनांमुळे होणारे प्रदूषण हेही मोठे आहे. यामुळे केंद्र सरकारने आपल्या वाहन धोरणात काही बदल केले आहेत. यात विजेवर चालणाऱ्या वाहनांसाठी पोषक वातावरण व ‘बीएस ४’ऐवजी ‘बीएस 6’ इंजिन मानांकन असलेली वाहनेच यापुढे निर्मिती व विक्रीवर बंधने आणली आहेत. केंद्रीय रस्ते परिवहन मंत्रालयाने 2017 रोजी अधिसूचना काढत 1 एप्रिल 2020 नंतर ‘बीएस 6’ वाहनांचीच निर्मिती करता येऊ शकते असे आदेश पारित केले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 4, 2019 9:55 am

Web Title: mahindra xuv300 petrol bs6 petrol launched prices hiked sas 89
Next Stories
1 64MP चा दमदार कॅमेरा, Redmi Note 8 Pro खरेदी करण्याची अजून एक संधी
2 USB Condom ची मागणी का सातत्याने वाढतेय?
3 थंडीत कशी घ्याल त्वचेची काळजी?
Just Now!
X