इंग्रजी नवीन वर्षाच्या सुरुवातीचा पहिला सण म्हणजे मकरसंक्रांत. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असं म्हणत वर्षभरातील सणांची या दिवसापासून सुरुवात होते. घरोघरी तिळगुळाचे लाडू केले जातात, हळदीकुंकवाचे कार्यक्रम केले जातात. त्यामुळे महिलावर्गाचा उत्साह काही औरच असतो. पण मकरसंक्रातीच्या आदल्या दिवशी भोगी साजरी केली जाते. या दिवशी भोगीची भाजी, भाकरी आणि एखादा गोड पदार्थ हा खास नैवेद्य देवाला दाखवला जातो. पण अनेक जणींना भोगीची भाजी नेमकी कशी करावी हे माहित नसतं. त्यामुळे ही भाजी कशी करायची हे आज जाणून घेऊयात.

साहित्य : साहित्य : वांगी – तीन, वर्णे – अर्धी वाटी, ताजे मटार – अर्धी वाटी, हिरवे हरभरे – अर्धी वाटी, भिजवलेले कच्चे शेंगदाणे – अर्धी वाटी, चिरलेली गाजरं – दोन, चिरलेला कांदा – एक, तीळ – एक टेबल स्पून, खोवलेलं ओलं खोबरं – अर्धी वाटी, चिरलेली कोथिंबीर – पाव वाटी, तिखट – दोन चमचे, मीठ – चवीनुसार, हळद, हिंग – प्रत्येकी अर्धा चमचा, तेल – पाव वाटी, गूळ – दोन चमचे, गरम मसाला पावडर – एक चमचा

alu in garden
निसर्गलिपी : येता बागेला बहर…
vam fish curry recipe in marathi
कोकणी पद्धतीने बनवा ‘वाम माशाचे झणझणीत कालवण’; ही घ्या सोपी रेसिपी
How to Remove Hair from Your Upper Lip Naturally
Dark Upper Lips: आता अप्पर लिप्स करण्यासाठी पार्लरची गरज नाही; या ४ घरगुती उपायांनी मिळवा सुटका
how to make puran poli for holi recipe
Holi recipe : ‘होळी रे होळी पुरणाची पोळी’! पाहा पदार्थाचे अचूक प्रमाण अन् पुरण वाटायची सोपी पद्धत

कृती : वांगी, गाजरं चिरून घ्या. सर्व भाज्या एकत्र करा. भांडय़ात तेल तापवा, त्यात कांदा परतून घ्या. हिंग, हळद घाला. भाज्या घालून छान परतून घ्या. तिखट, मीठ, गरम मसाला पावडर, तीळ, खोबरं घालून छान एकजीव करा. गूळ घाला. गरजेनुसार पाणी घालून शिजवून घ्या. शेवटी कोथिंबीर घाला.भोगीच्या दिवशी ही भाजी करतात. बाजरीची भाकरी, चटणी, मेथीच्या भाजीसोबत ही भाजी नैवेद्यासाठी करतात.

सौजन्य – लोकप्रभा