16 December 2017

News Flash

त्वचेपासून इन्सुलिन तयार करणाऱ्या पेशीची निर्मिती

संशोधकांनी एक पाऊल आणखी पुढे टाकले

पीटीआय, लंडन | Updated: August 18, 2017 2:23 PM

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

मधुमेहावर आवश्यक ते उपचार घेतल्यास तो नक्की बरा होऊ शकतो. याबाबत संशोधकांनी एक पाऊल आणखी पुढे टाकले आहे. स्टेम सेल तंत्रज्ञानाच्या मदतीने त्वचेपासून इन्सुलिनची निर्मिती करणारी पेशी तयार करण्यात संशोधकांना यश आले आहे.

नॉर्वेतील बर्गेन विद्यापीठाच्या संशोधकांनी याबाबत अधिक संशोधन केले. संशोधकांनी मधुमेह असणाऱ्या रुग्णांच्या शरीरावरील त्वचेपासून इन्सुलिनची निर्मिती करणाऱ्या पेशींची निर्मिती केली. मधुमेह असणाऱ्या लोकांच्या त्वचेखाली या पेशीचे प्रत्यारोपण करणे हा त्यांचा उद्देश होता.

हा अभ्यास मधुमेहावरील एक नवीन संशोधन असून, पेशींद्वारे  शरीरामध्ये इन्सुलिनची निर्मिती करता येऊ शकते म्हणून या संशोधनाचा मोठा फायदा होणार आहे, असे बर्गेन युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक हेल्गी राडेर यांनी म्हटले आहे. इन्सुलिनची मात्रा पुनस्र्थित करणे आणि रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्यासाठी इन्सुलिन बनविणाऱ्या पेशीची निर्मिती करणे हा संशोधकांचा मुख्य उद्देश होता. कॅप्सूल आणि बदललेल्या पेशीमुळे मधुमेह असणाऱ्या रुग्णांवर यशस्वी उपचार करता येणे शक्य होणार आहे.

मधुमेहावरील औषधाची निर्मिती करणाऱ्यांसाठी अतिशय मोठी बाजारपेठ उपलब्ध असून यशस्वी उपचार करण्यासाठी आवश्यक ते संशोधन बाजारात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. सध्या जगभरातील ४०० दशलक्ष लोकांना मधुमेह  आहे. मधुमेह या आजारात माणसाच्या शरीरातले स्वादुपिंड पुरेसे इन्सुलिन तयार करू शकत नाही. किंवा शरीरातील तयार झालेल्या इन्सुलिनला पेशीकडून पुरेसा प्रतिसाद मिळत नाही. या दोन्ही प्रकारांत पेशींमध्ये ग्लुकोज शोषण्याच्या क्रियेत अडथळा निर्माण होतो. तोंडाने घ्यावयाची औषधे किंवा काही रुग्णांमध्ये दररोज इन्सुलिनचे इंजेक्शन घ्यावे लागते.

First Published on August 11, 2017 2:04 am

Web Title: make insulin from skin