News Flash

स्वयंपाक घरातील “या” पाच औषधी मसाल्यांचा आहारात करा वापर!

आतड्यांसंबंधित उद्भवणार्‍या गोष्टीचं निराकरण करणे गरजेचं आहे. याकरिता डॉ. दीक्षा भावसार यांनी आपल्या स्वयंपाक घरात असलेले काही औषधी वनस्पती, व मसाले आहेत ज्याचे या गोष्टींवर

lifestyle

करोना संसर्गापासून तसेच अनेक संसर्गापासून बचाव करण्यासाठी अनेक औषध गोळ्या आपण प्रत्येकजण घेत असतो. मात्र याने तुमच्या पोटात जळजळ जाणवणे, सूज येणे, पीसीओएस किंवा थायरॉईडसह आतड्यांशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. तर संधिवातापासून हाशिमोटोपर्यंतच्या ऑटो इम्यून डिसॉर्डर्सचं प्रमुख कारण जळजळ आहे. यासाठी आतड्यांसंबंधित उद्भवणार्याघ गोष्टीचं निराकरण करणे गरजेचं आहे. याकरिता डॉ. दीक्षा भावसार यांनी आपल्या स्वयंपाक घरात असलेले काही औषधी वनस्पती, व मसाले आहेत ज्याचे योग्य पद्धतीने सेवन केल्याने या गोष्टींवर मात करता येते. चला तर मग जाणून घेऊयात आपल्या स्वयंपाक घरातील या पाच औषधी मसाले ज्याने तुमच्या आतड्यातील जळजळ कमी होऊन अनेक आजारांपासून मुक्तता मिळेल.

१) हळद

हळद आपल्या स्वयंपाकघरात रोज वापरली जाते. हळद शरीरासाठी खूप गुणकारी असते. कारण हळदीमध्ये करक्युमिन हे औषधी घटक असून, त्यात अॅंटीऑक्सिडेंट गुणधर्म आहेत. या घटकांमुळे विविध प्रकारच्या संसर्गापासून तुमचे संरक्षण होते. तसेच हळदीमधील अॅंटीसेप्टिक गुणधर्मामुळे जखम लवकर भरून निघते.

२) काळी मिरी

काळी मिरी ही आपल्या शरीरसाठी व आरोग्यासाठी महत्वाची आहे. कधी कधी आपल्या शरीरात अचानक सूज निर्माण होते. आणि ही सूज कमी करण्याचे काळी मिरी महत्वाची भूमिका बजावते. कारण काळ्या मिरीमध्ये सूज विरोधी गुणधर्म असतात. शरीरात होणारी विविध प्रकारची सूज विशेषत: आतड्यांना सूज तसेच स्नायू, सांधे यांना सूज दूर करण्यात सुद्धा काळी मिरी रामबाण ठरते.

३) आले (अद्रक)

डॉ. भावसार यांच्या मते, सुकवलेले आले एक विश्भेाषजा म्हणून अत्यंत उपयुकत औषध म्हणून ओळखले जाते. सूज येणे, सांधेदुखी, यावर औषध म्हणून सुकलेल्या आल्याचा उपचार करणे योग्य आहे.

४) लवंग

लवंग हा पोटातील गॅस, जळजळीसारख्या समस्यांवर गुणकारी ठरते. दातदुखी असो, घशाचा त्रास, सांधेदुखी, लवंग नेहमीच या त्रासांपसून बचाव करतो.

५ ) मेथी

सांधेदुखी, जळजळ, सूज येणे, वजन कमी करणे यावर औषध म्हणून शतकानुशतके मेथी दानाच्या वापर केला जातो. स्टीम इनहेलेशनसाठी आपण मेथी पाण्याचा वापर देखील करू शकता. कारण यामुळे आपल्या श्वसन मार्गातील जळजळ कमी होते.

(टीप: या टिप्सचा वापर करण्यापूर्वी आपल्या फॅमेली डॉक्टरचा अथवा या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 26, 2021 4:18 pm

Web Title: make use of these five kitchen herbs spices in the diet scsm 98
Next Stories
1 भारतातील सर्वात स्वस्त 5G Redmi Note 10T चा आज पहिलाच सेल, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
2 त्वचेवर हळद लावताना हमखास होणाऱ्या ‘या’ ५ चुका टाळाच! 
3 एटीएममधून पैसे काढण्याच्या नियमामध्ये १ ऑगस्टपासून बदल; जाणून घ्या अधिक माहिती