21 September 2020

News Flash

मलेरिया निर्मूलनासाठी देशात ‘आघाडी’

मलेरिया नियंत्रणाच्या आघाडीवर भारताने गेल्या काही दशकांत प्रभावी काम केले आहे.

भारतातून २०३० पर्यंत मलेरियाचे निर्मूलन करण्याच्या उद्देशाने भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (दी इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च-आयसीएमआर) ‘भारत मलेरिया निर्मूलन संशोधन आघाडी’ची (मलेरिया एलिमिनिशन रिसर्च अलायन्स, इंडिया- एमईआरए) स्थापना केली आहे. देशात मलेरिया निर्मूलनाचे लक्ष्य साध्य करण्यासाठी काम करणाऱ्या संस्थांचे हे संयुक्त व्यासपीठ असेल. त्याद्वारे हे ध्येय साध्य करण्यासाठी प्राधान्यक्रम निश्चित करणे, नियोजन करणे आणि संशोधनाला चालना देणे ही कामे केली जातील.

याबाबत ‘आयसीएमआर’चे महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी सांगितले की, या आघाडीचे प्रमुख कार्य हे मलेरिया निर्मूलनासाठी देशात संशोधन आणि नियोजनाच्या पातळीवर समन्वय साधून संयुक्तपणे उपाययोजना निश्चित करणे हे असेल.

मलेरिया नियंत्रणाच्या आघाडीवर भारताने गेल्या काही दशकांत प्रभावी काम केले आहे. त्यामुळे मलेरियाचे देशातले प्रमाण ८० टक्क्यांहून अधिक कमी झाले आहे. देशात सन २००० मध्ये मलेरियाचे २० लाख ३० हजार रुग्ण आढळले होते. ही संख्या २०१८ मध्ये तीन लाख ९० हजार होती. देशातील मलेरिया प्रतिबंधक उपाययोजनांमुळे या रोगाने होणारे मृत्यू ९० टक्क्यांनी कमी झाले आहेत. देशात मलेरियामुळे सन २००० मध्ये ९३२ जणांचे मृत्यू झाले, तर हीच संख्या २०१८ मध्ये ८५ इतकी नोंदविण्यात आली आहे, अशी माहिती भार्गव यांनी दिली. ‘एमईआरए’ प्रकल्प हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, असे केंद्रीय आरोग्य सचिव प्रीती सुदान यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 27, 2019 1:04 am

Web Title: malaria in india
Next Stories
1 जिओ बंपर ऑफर, 299 च्या रिचार्जवर दररोज 3GB डेटा आणि 5 हजार 300 चा फायदा
2 Oppo A7 च्या किंमतीत घट, जाणून घ्या नवी किंमत
3 55 लोकप्रिय स्मार्टफोन्समधून होतंय रेडिएशन, तुमचा फोन आहे का सुरक्षित?
Just Now!
X