News Flash

कर्करोगाला मारक तांदळाचे वाण विकसित

जनुके वितरित करण्याची क्षमता असलेली प्रणाली विकसित केली आहे.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

चीनच्या शास्त्रज्ञांनी जनुकीयरीत्या सुधारित (जनेटिकली मॉडीफाइड) जांभळ्या रंगाचा तांदूळ निर्माण केला असून त्यामुळे अनेक प्रकारचे कर्करोग, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग, मधुमेह होण्याचा धोका कमी होत असल्याचे दिसून आले आहे. तसेच यामुळे खूप वर्षे असलेल्या जुन्या व्याधी दूर होत असल्याचे समोर आले आहे.

संशोधकांनी एकाच वेळी अनेक जनुके वितरित करण्याची क्षमता असलेली प्रणाली विकसित केली आहे. त्याचा वापर भात पिकविताना त्याच्या मुळांत करण्यात आला. त्यामुळे वनस्पतीला मोठय़ा प्रमाणात पोषक द्रव्ये मिळतात. त्यामुळे वनस्पतीमध्ये एन्थॉस्किनिन हे उच्च दर्जाचे ‘अँटिऑक्सिडेंट’ रंगद्रव्ये तयार होते.

आम्ही अत्यंत कार्यक्षम आणि सहज वापर करण्यासारखी ट्रान्सजीन स्टॅकिंग प्रणाली (ट्रान्सजीन स्टॅकिंग -दोन) विकसित केली आहे. प्लान्ट ट्रान्सफॉर्मेशनसाठी मोठय़ा प्रमणावर जनुकेतयार करण्याचे काम यामध्ये केले जाते, असे दक्षिण चीन कृषी विद्यापीठातील याओ झुंग लिऊ यांनी सांगितले.

या प्रणालीचे अनेक फायदे असून, संश्लेषित जीव विज्ञान आणि मेटाबोलिक इंजिनीअरिंग या क्षेत्रामध्ये अनेक फायदे दिसून येतात. आतापर्यंत आनुवांशिक आभियांत्रिकी (जनॅटिक इंजिनीअरिंग) पद्धतीद्वारे बीटा कॅरोटीन आणि फॉलेट तांदळाची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र एन्थॉस्किनिन तांदळाची निर्मिती करण्यात आली नव्हती. असे संशोधन मका, गहू आणि सातूमध्ये शक्य असल्याचे लिऊ यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 29, 2017 2:14 am

Web Title: marathi articles on genetically modified rice
Next Stories
1 मिनरल वॉटरच्या बाटल्यांचा पुनर्वापर करताय? मग हे जरूर वाचा
2 स्मोकिंग सोडायचंय, मग हे घरगुती उपाय करा!
3 ऑनलाईन डेटिंग करताय? मग ‘हे’ नक्की लक्षात ठेवा