मारूती सुझुकी इंडियानं आपल्या गाड्या भाड्यानं देण्यास सुरूवात केली आहे. ‘मारूती सुझुकी सबस्क्राईब’ या नावानं कंपनीनं ही सुविधा सुरू केली आहे. सामान्यत: भाड्याने देण्यात येणाऱ्या वाहनांमध्ये कार कंपनी ग्राहकाला त्याच्या वैयक्तिक वापरासाठी निश्चित कालावधीसाठी सशर्त वाहनं देत असते. यासाठी ग्राहकांना पूर्ण किंमत देऊन ती गाडी खरेदी करावी लागत नाही. ग्राहकाला त्याच्या वापराच्या कालावधीसाठी फक्त गाडीचं भाडं द्यावं लागतं. गाडीवर मालकी हक्क मात्र कंपनीचाच असतो.

“सुरुवातीला पायलट प्रोजेक्टच्या स्वरूपात गुरुग्राम आणि बेंगळुरू येथे ही सेवा सुरू केली आहे. याअंतर्गत कंपनी स्विफ्ट, स्विफ्ट डिझायर, विटारा ब्रेझा आणि अर्टिगाला मारुती सुझुकी अरेनाच्या माध्यमातून उपलब्ध करून देणार आहे. तर बलेनो, सियाझ आणि एक्सएल ६ या गाड्या नेक्साद्वारे भाड्याने उपलब्ध करुन देण्यात येतील,” असं मारूती सुझुकीनं एका निवेदनाद्वारे सांगितलं आहे. या सेवेसाठी त्यांनी ओरिक्स ऑटो इन्फ्रास्ट्रक्चर सर्व्हिस लिमिटेडबरोबर करार केला आहे. ही जपानच्या ऑरिक्स कॉर्पोरेशनचीच एक उपकंपनी आहे. ती कंपनी भारतात ही सेवा पुरवणार आहे.

navi mumbai nmmt bus marathi news, nmmt digital boards marathi news
नवी मुंबई: बस थांब्यांवरील डिजिटल फलक बंद, एनएमएमटी बस प्रवाशांची मोठी गैरसोय
Wrist ticket, Metro 1, Mumbai,
मुंबई : ‘मेट्रो १’मधील प्रवासासाठी मनगटी तिकिटाचा पर्याय, एमएमओपीएलकडून नवीन तिकीट सेवा कार्यान्वित
tank bomb shell Hinjewadi
हिंजवडीत पुलाचे काम करताना रणगाड्याचे बॉम्बशेल सापडले
dombivli ganesh nagar marathi news
डोंबिवलीतील गणेशनगरमधील रस्ता काँक्रीटीकरणासाठी बंद, नवापाड्यात जाण्यासाठी प्रवाशांचा वळसा घेऊन प्रवास

ह्युंदाई, एमजी मोटर्सकडूनही सुविधा

करोनाच्या संकटकाळात वाहनांची विक्री वाढविण्यासाठी आणि अधिकाधिक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वाहन कंपन्या नवनवे मार्ग शोधत आहेत. गेल्या वर्षी मारुतीच्या प्रतिस्पर्धी ह्युंदाई मोटर इंडियानेही अशाप्रकारची सेवा सुरू केली होती. सुरूवातीच्या काळात सहा शहरांमध्ये सेल्फ-ड्राइव्ह कार शेअरींग कंपनी रेव यांच्या भागीदारीत ही सेवा लाँच केली होती. त्याचप्रमाणे मायल्स यांच्यासह एमजी मोटरदेखील आपल्या गाड्या भाड्याने देत आहे. जर्मन कार कंपनी फोक्सवॅगननेही यावर्षी मे महिन्यापासून आपल्या सर्व बीएस ६ गाड्या भाड्याने उपलब्ध करुन देण्याची योजना सुरू केली आहे. याअंतर्गत ग्राहक किमान दोन ते चार वर्षांच्या गाड्या भाड्याने घेऊ शकतात.