17 October 2019

News Flash

मारुती सुझुकीच्या कार झाल्या महाग, जाणून घ्या किती वाढल्या किंमती

देशातील अग्रगण्य कार निर्माती कंपनी मारुती सुझुकीच्या कार महाग झाल्या आहेत

देशातील अग्रगण्य कार निर्माती कंपनी मारुती सुझुकीच्या कार महाग झाल्या आहेत. कंपनीने काही निवडक गाड्यांच्या किंमतींमध्ये 10 हजार रुपयांची वाढ केली आहे.

कच्च्या मालाच्या वाढलेल्या किंमती (कमोडिटी किंमती) आणि विदेशी विनिमय दरांमुळे (फॉरेन एक्सचेंज रेट) कंपनीने किंमती वाढवल्यात. आजपासूनच(दि.10) ही वाढ करण्यात आल्याचं कंपनीने जाहीर केलंय.

नेमक्या कोणत्या गाड्यांच्या किंमतींमध्ये वाढ करण्यात आलीये याबाबत मात्र अद्याप मारुती सुझुकीकडून माहिती देण्यात आलेली नाहीये. पण ही दरवाढ आजपासूनच सुरू झाल्याचं कंपनीने स्पष्ट केलं आहे. मारुतीव्यतिरिक्त बीएमडब्ल्यू, ह्युंडाई, टाटा मोटर्स, होंडा, रेनॉ, निसान आणि टोयोटा यांसारख्या प्रमुख कार कंपन्यांनीही काही दिवसांपूर्वीच याच कारणामुळे आपल्या गाड्यांच्या किंमतीमध्ये वाढ केली आहे.

First Published on January 10, 2019 2:47 pm

Web Title: maruti suzuki announces price hike of select models