मारुती सुझुकीने आपली Celerio ही कार बीएस-6 इंजिन मानकांसह लाँच केली आहे. 4.41 लाख रुपये इतकी कारच्या बेसिक व्हेरिअंटची (LXi)एक्स-शोरुम किंमत ठेवण्यात आली आहे. तर, टॉप व्हेरिअंट ZXi (O) AMT ची एक्स-शोरुम किंमत 5.67 लाख रुपये आहे. आधीच्या बीएस-4 व्हर्जनपेक्षा बीएस-6 व्हर्जन जवळपास 15 हजार ते 24 हजार रुपयांनी महाग आहे.

नव्या Celerio मध्ये 998cc, 3सिलिंडर पेट्रोल इंजिन आहे. हे इंजिन 68bhp ची ऊर्जा आणि 90Nm पीक टॉर्क निर्माण करते. तसेच, स्टँडर्ड ड्रायव्हर-साइड एअरबॅग, इलेक्ट्रॉनिक ब्रेक फोर्स डिस्ट्रीब्यूशन (EBD, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS), स्पीड अलर्ट सिस्टिम, सीट बेल्ट रिमाइंडर, रिअर पार्किंग सेंसर्स यांसारखे सिक्युरिटी फीचर्स आहेत. याशिवाय इंजिनमध्ये 5 स्पीड मॅन्युअल किंवा AMT ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा पर्याय मिळेल.

डिसेंबर 2019 मध्ये मारुतीच्या Celerio चे प्रोडक्शन 5,958 युनिट होते, तर डिसेंबर 2018 मध्ये प्रोडक्शन 9,595 युनिट होते. गेल्या महिन्यात कंपनीने 5,429 गाड्या तर डिसेंबर 2018 मध्ये कंपनीने 9,000 गाड्यांची विक्री केली. तर, चालू आर्थिक वर्षात एप्रिल-डिसेंबर 2019 दरम्यान भारतीय बाजारात 46,275 Celerio ची विक्री झाली. भारतीय बाजारात Celerio ची टक्कर ह्युंदाई सँट्रो, डॅटसन गो आणि टाटा टिआगो फेसलिफ्ट यांसारख्या कारसोबत असेल.