देशातील दिग्गज कार कंपनी मारुती सुझुकीने आपल्या Dzire या मॉडेलची विशेष आवृत्ती लॉन्च केली आहे. पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही प्रकारांमध्ये हे मॉडेल खरेदी करता येईल. Dzire च्या मूळ मॉडेलच्या एलएक्सआय आणि एलडीआय या व्हेरिअंट्सवर हे मॉडेल आधारित आहे.

मारुती सुझुकी स्पेशल एडिशनच्या पेट्रोल व्हेरिअंटसाठी ग्राहकाला 5.56 लाख (दिल्ली एक्स शोरुम) रुपये मोजावे लागतील. तर डिझेल व्हेरिअंटची किंमत 6.56 लाखांपासून सुरू होत आहे. कंपनीच्या सर्व शोरुममध्ये अल्पावधीसाठी हे मॉडेल ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत. स्पेशल एडिशनमध्ये 1.2 लीटर पेट्रोल आणि 1.3 लीटर डीझेल इंजिन देण्यात आले आहे . यामध्ये 1.2 लीटर फोर-सिलेंडर पेट्रोल इंजिन 82bhp पावर आणि 113Nm टॉर्क जनरेट करतं. तर, 1.3 लीटर डिझेल इंजिन 74bhp पावर आणि 190Nm पिक टॉर्क जनरेट करतं. 5 स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटीक हे गिअर्सचे दोन्ही पर्याय देण्यात आले आहेत.

या मॉडेलमध्ये मूळ व्हेरिअंटपेक्षा काही नव्या फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये ब्ल्यु-टुथच्या सहाय्याने सज्ज असलेली ऑडियो सिस्टीम, रिमोट सेंट्रल लॉकिंग, व्हिल कव्हर्स, रिअर पार्किंग सेंसर आदींचा समावेश आहे. याशिवाय ड्युअल एअरबॅग्ज, अॅंटी लॉक ब्रेकींग सिस्टीम(ABS),ब्रेक असिस्ट आदी मूळ व्हेरिअंटमधील फिचर्सही आहेत.