03 March 2021

News Flash

‘मारुती’ची ऐतिहासिक झेप, ओलांडला मैलाचा दगड

देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने ऐतिहासिक कामगिरीची नोंद केलीये

(संग्रहित छायाचित्र, सौजन्य - पीटीआय)

देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने ऐतिहासिक कामगिरीची नोंद करत प्रवासी वाहन्यांच्या विक्रीत मैलाचा दगड ओलांडलाय. देशांतर्गत बाजारपेठेत कंपनीने दोन कोटी प्रवासी वाहनांची विक्री केली आहे. भारतात कंपनीने आपली मारुती 800 ही पहिली कार 1983 मध्ये लाँच केली होती. ही कार मध्यमवर्गीयांमध्ये विशेष लोकप्रिय ठरली होती. लाँचिंगनंतर पहिल्या एक कोटी कार विकण्यासाठी कंपनीला जवळपास तीन दशकांचा कालावधी लागला. अर्थात 37 वर्षांच्या व्यावसायिक कालखंडात एक कोटी वाहनांची विक्री करण्यासाठी कंपनीला तब्बल 29 वर्षांची वाट पाहावी लागली होती. तर उर्वरित एक कोटी कार कंपनीने केवळ 8 वर्षांच्या काळात विकल्या.

सर्वाधिक विक्री कोणत्या गाड्यांची?
मारुती 800 ची 30 लाख मॉडेल्स बाजारात विकली गेली आहेत.
त्यानंतर सर्वाधिक विक्रीत ऑल्टो 31 लाख,
त्याखालोखाल वॅगनआर सुमारे 21 लाख,
ओम्नी आणि स्विफ्ट याची 20 लाख वाहने विक्री करण्यात आली आहे.

आणखी वाचा – Hyundai Venue चा जलवा; आफ्रिकेतही निर्यात, बुकिंग एक लाखांपार

कंपनीचे भारतात कुठे कुठे आहेत कारखाने? 
गुजरातमधील मेहसाणा, हरियाणातील मानेसार आणि गुडगांव-दिल्ली या तीन ठिकाणी कंपनीची उत्पादन निर्मिती कारखाने आहेत.

कोणकोणत्या देशांमध्ये निर्यात ?
भारतात निर्मित होत असलेल्या अनेक कार अमेरिका, युरोप, आफ्रिका आणि आशिया खंडासह 100 देशांमध्ये निर्यात केल्या जातात.

भागीदारी –
जपानच्या सुझुकी आणि भारतीय मारुती उद्योग समूहाची भागीदारी असलेली ही कंपनी आहे. कंपनीमध्ये सुझुकी समूहाची 56 टक्के तर 44 टक्के मारुती उद्योगाची मालकी आहे.

सध्या मारुती-सुझुकी उद्योग समूहाच्या विविध प्रकारातील 16 मॉडेल्स बाजारात उपलब्ध आहेत. कंपनीची डिझायर, बलेनो, आल्टो, स्विफ्ट, वॅगनआर आणि व्हिटारा-ब्रेझा यांसारखी अनेक मॉडेल्स भारतीय बाजारपेठेत लोकप्रिय आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 2, 2019 2:46 pm

Web Title: maruti suzuki new record becomes only car maker in india to cross 20 million in sales sas 89
Next Stories
1 खेळणीच्या दुकानाने जागा केला आमदारांतील ‘बाप’, रोहित पवारांची भावनिक पोस्ट
2 सब लेफ्टनंट शिवांगीने रचला इतिहास; बनली भारतीय नौदलाची पहिली महिला पायलट
3 Video: …आणि त्या क्षणी कोब्राच्या तावडीतून निसटलं मुंगूस
Just Now!
X