News Flash

मारुती सुझुकीची नवी WagonR लाँच , जाणून घ्या सर्व फीचर्स आणि किंमत

स्टिअरींग माउंटेड कंट्रोलचा पर्याय यामध्ये असून ड्युअल एअरबॅग्स, एबीएस, ईबीडी आणि रिअर पार्किंग सेंसर यांसारखे अनेक फीचर्स

मारुती सुझुकीची बहुप्रतिक्षित नवीन WagonR अखेर लाँच झाली आहे. नेक्स्ट जनरेशन WagonR ची किंमत 4.19 लाख ते 5.69 लाख रुपये आहे. इंजिनचे दोन पर्याय आणि सात व्हेरिअंटमध्ये ही कार सादर करण्यात आली आहे. या कारमुळे भारतीय बाजारातील Hyundai Santro आणि Tata Tiago ला थेट टक्कर मिळेल असं म्हटलं जातंय. व्हाइट, सिल्वर, ग्रे, ऑरेंज, ब्राउन आणि ब्ल्यू कव्हर्स अशा रंगांमध्ये ही कार उपलब्ध असेल.

किंमत आणि व्हेरिअंट –
> Wagon R 1.0 LXi : 4.19 लाख रुपये
> Wagon R 1.0 VXi : 4.69 लाख रुपये
> Wagon R 1.0 VXi AMT : 5.16 लाख रुपये
> Wagon R 1.2 VXi : 4.89 लाख रुपये
> Wagon R 1.2 VXi AMT : 5.36 लाख रुपये
> Wagon R 1.2 ZXi : 5.22 लाख रुपये
> Wagon R 1.2 ZXi AMT : 5.69 लाख रुपये

अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या मारुती सुझुकीच्या नव्या WagonR साठी बुकिंग आधीच सुरू झाली आहे. मारुती सुझुकीचे अधिकृत विक्रेते (डिलर्स) आणि कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावरुन या कारसाठी नोंदणी करता येईल. 11 हजार रुपयांमध्ये या कारसाठी बुकिंग सुरू आहे.

फीचर्स –

या कारचं डिझाइन टॉल बॉयप्रमाणेच असेल. गाडीचे रूपडे आतून आणि बाहेरून बदललेले दिसणार आहे. पहिल्या वॅगनआरच्या तुलनेने ही गाडी अधिक मोठी असणार आहे. गाडीत सात इंचाची टाचस्क्रीनसह इंफोटेनमेंट प्रणाली असणार आहे. इंफोटेनमेंट प्रणालीला अॅपल कार-प्ले, अँन्ड्रॉइड ऑटो सपोर्ट आहे. तर, डॅशबोर्डला ब्लॅक आणि ग्रे रंगाचं ड्युअल टोन फिनिशींग आहे. तसंच स्टिअरींग माउंटेड कंट्रोलचा पर्याय यामध्ये असून ड्युअल एअरबॅग्स, एबीएस, ईबीडी आणि रिअर पार्किंग सेंसर यांसारखे फीचर्स आहेत. ही कार नव्या प्लॅटफॉर्मवर बनवण्यात आली असून पूर्वीच्या मॉडेलहून वजनाने हलकी असल्याचे कंपनीने म्हटले आहे. जुन्या कारच्या तुलनेत नव्या कारचं वजन 50 ते 65 किलो कमी असू शकतं. गाडीचे मायलेज चांगले असल्यास गाडी ग्राहकांच्या पसंतीला उतरण्याची शक्यता आहे.

इंजिन –
इंजिनचे दोन पर्याय आणि सात व्हेरिअंटमध्ये ही कार सादर करण्यात आली आहे. दोन इंजिनपैकी एक इंजिन स्विफ्ट कारचं K-सीरीज 1.2-लीटर, 4-सिलिंडर पेट्रोल इंजिन आहे. हे इंजिन 83hp पावर आणि 113Nm टॉर्क जनरेट करतं. तर दुसरं इंजिन जुन्या वॅगनआर मॉडलचं 1.0-लीटर इंजिन आहे. हे इंजिन 67hp ची पावर आणि 90 Nm टॉर्क जनरेट करतं. दोन्ही इंजिनमध्ये 5-स्पीड मॅन्युअल आणि 5-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा (AGS) पर्याय आहे. गाडी पेट्रोल, एलपीजी आणि सीएनजी व्हर्जनमध्येदेखील उपलब्ध केली जाणार असल्याचं समजतंय. नवी वॅगनआर सात व्हेरिअंट्समध्ये बाजारात लाँच केली जाईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2019 2:11 pm

Web Title: maruti suzuki new wagon r launched know price and all features
Next Stories
1 व्यायामात सातत्य राखण्याच्या सोप्या टिप्स
2 ‘लँबॉर्गिनी’ची शानदार Aventador SVJ भारतात लाँच, किंमत…
3 ‘निसान’ची नवी एसयुव्ही ‘किक्स’ लाँच, किंमत 9.55 लाख रुपये
Just Now!
X