24 November 2020

News Flash

करोना संकटातही Maruti Suzuki सुसाट, कंपनीने विक्रीची नवीन आकडेवारी केली जाहीर

ऑगस्ट महिन्यातील वाहनांच्या विक्रीचा रिपोर्ट सादर

देशभरात करोना महामारीचा फैलाव झालाय, या जीवघेण्या व्हायरसमुळे लॉकडाउन असल्याचा फटका देशाच्या ‘जीडीपी’लाही बसला आहे. अशातही देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी Maruti Suzuki शानदार कामगिरी केली आहे. कंपनीने ऑगस्ट महिन्यातील आपल्या वाहनांच्या विक्रीचा रिपोर्ट सादर केला आहे, यात वाहनांच्या विक्रीत एकूण 22 टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट महिन्यात कंपनीने स्थानिक बाजापेठेत 1 लाख 15 हजार 325 वाहनांची विक्री केली. विशेष म्हणजे हा आकडा गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात झालेल्या विक्रीच्या तुलनेत 21.7 टक्के जास्त आहे. तर, एकूण विक्रीच्या बाबतीतही (एक्स्पोर्ट मार्केटसह) कंपनीने 17.1 टक्के वाढ नोंदवली आहे. म्हणजे कंपनीने ऑगस्ट महिन्यात एकूण 1 लाख 24 हजार 624 वाहनांची विक्री केली आहे.

(फक्त 17 हजार 600 रुपयांमध्ये घेऊन जा नवी कोरी कार, Maruti Suzuki ने आणली जबरदस्त ऑफर)

छोट्या गाड्यांनी केली कमाल :
कंपनीच्या मिनी सेगमेंटमधील गाड्यांची विक्री चांगली राहिली. मारुतीच्या Alto आणि S-Presso यांसारख्या मॉडेल्सच्या विक्रीमध्ये जवळपास 94.7 टक्के वृद्धी झाली. ऑगस्ट महिन्यात कंपनीने या सेगमेंटमध्ये 19 हजार 709 युनिट्स कारची विक्री केली आहे. हा आकडा गेल्या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यापेक्षा जास्त आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये केवळ 10 हजार 123 युनिट्स गाड्यांची विक्री झाली होती. तर, कॉम्पॅक्ट सेगमेंटमध्ये Wagon R, Swift आणि डिझायर यांसारख्या गाड्यांच्या विक्रीमध्ये 14.2 टक्क्यांची वाढ झाली आहे. या सेगमेंटमध्ये कंपनीने 61 हजार 956 युनिट्स कारची विक्री केली आहे. यामुळे देशात एन्ट्री लेवल कार खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचं स्पष्ट होत आहे. पण दुसरीकडे, मिड साइझ सिडान Ciaz या एकमेव कारच्या विक्रीमध्ये 23.4 टक्के घट झाली आहे. या दरम्यान कंपनीने केवळ 1,223 सियाझ कारची विक्री केली आहे. तुलनेने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये कंपनीने 1,596 सियाझ विकल्या होत्या. मात्र एकूणच आता अनलॉक प्रक्रियेदरम्यान देशातील ऑटो सेगमेंट पुन्हा पूर्वपदावर येताना दिसत असून मारुतीने पुन्हा वेग पकडला आहे.

(फक्त 17 हजार 600 रुपयांमध्ये घेऊन जा नवी कोरी कार, Maruti Suzuki ने आणली जबरदस्त ऑफर)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2020 4:53 pm

Web Title: maruti suzuki reports 22 percent domestic sales growth in august as entry level cars become more popular sas 89
Next Stories
1 सौंदर्या खुलवण्यापासून ते भांडी चमकवण्यापर्यंत जाणून घ्या लिंबाच्या सालीचे भन्नाट फायदे
2 सतत पोट दुखतंय? मग करा ‘हे’ सहा घरगुती उपाय
3 कुरकुरे, अंकल चिप्स खरेदी केल्यास मिळेल फ्री 2GB डेटा, Airtel ची भन्नाट ऑफर ; जाणून घ्या डिटेल्स
Just Now!
X