‘टाय’ बांधण्याच्या तब्बल १,७७,१४७ पद्धतींचे संशोधन गणिततज्ञांनी केले आहे. केंब्रिज विद्यापीठाच्या माध्यमातून याआधी टाय बांधण्याच्या पद्धतींवरील संशोधनातून ८५ पद्धती अंतिम करण्यात आल्या होत्या परंतु, त्यानंतर गणिततज्ञांनी पद्धती मोजण्याबाबतीत पुढे अधिक संशोधन करून टाय तब्बल १,७७,१४७ पद्धतींनी बांधता येऊ शकते असे स्पष्ट केले आहे.
स्विडनमधील केटीएच रॉयल या तांत्रिक संस्थेने टाय बांधण्याच्या पद्धतींमध्ये स्वारस्य घेऊन तब्बल १,७७,१४७ पद्धतींचा शोध लावला आहे. यात यूट्यूबवरील टाय बांधण्याच्या पद्धतीच्या व्हिडिओवर संबंधित पद्धती मोजण्याच्या निष्कर्शांवर अभ्यास केला गेला. त्यानुसार आधीच्या पद्धतींमध्ये वाढ करण्याची गरज असल्याचे निष्पन्न झाले आणि पद्धती मोजण्याच्या गणिती तंत्राचा वापर करून एकूण १,७७,१४७ पद्धतींचा शोध लावला गेला आहे.