27 February 2021

News Flash

सरकारने लाँच केलं खास मोबाइल अ‍ॅप, सहज मिळेल 450 शहरांतील हवामानाची माहिती

युजर्सना अलर्ट करण्यासाठी सर्व जिल्हे लाल, पिवळा आणि नारंगी या तीन रंगांमध्ये दाखवणारं फीचरही

संग्रहित छायाचित्र

देशातील बदलतं हवामान आणि त्याबाबतची महत्त्वाची माहिती लोकांपर्यंत सहजपणे पोहोचावी यासाठी सरकारने एक नवीन मोबाइल अ‍ॅप लाँच केलं आहे. भूविज्ञान (पृथ्वी विज्ञान मंत्रालय) मंत्री हर्षवर्धन यांनी ‘मौसम’ नावाचं हे अ‍ॅप लाँच केलं. अँड्रॉइड युजर्ससाठी गुगलच्या प्ले-स्टोअर आणि अ‍ॅपल युजर्ससाठी अ‍ॅप स्टोअरवर ‘मौसम’ हे अ‍ॅप उपलब्ध झालं आहे.

‘मौसम’ अ‍ॅपद्वारे जवळपास 200 शहरांचं तापमान, आर्द्रता, हवेचा वेग, दिशा इत्यादी अनेकप्रकारची माहिती मिळेल. याशिवाय, अ‍ॅपमध्ये जवळपास 450 शहरांच्या आगामी सात दिवसांच्या हवामानाबाबतचा अंदाज तुम्हाला कळेल. दिवसातून आठ वेळेस यातील माहिती अपडेट होईल. एखाद्या शहरातील गेल्या 24 तासांमधील आकडेवारीही यात दिसेल. तर, युजर्सना अलर्ट करण्यासाठी सर्व जिल्हे लाल, पिवळा आणि नारंगी या तीन रंगांमध्ये दाखवणारं फीचरही यामध्ये आहे.


‘मौसम’ अ‍ॅपद्वारे हवामानाची सर्व महत्त्वाची माहिती मिळेल. इंटरनॅशनल क्रॉप्स रिसर्च इंस्टीट्यूट फॉर सेमी-एरिड ट्रॉपिक्स (ICRISAT),भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था (आयआयटीएम) आणि भारतीय हवामान विभाग (आयएमडी) यांनी संयुक्तपणे ‘मौसम’ अ‍ॅप डेव्हलप केलं आहे. यावेळी, “वेधशाळेच्या नेटवर्कमध्ये वाढ करण्यासाठी, नवीन संगणकीय संसाधने खरेदी करण्यासाठी मोठ्या गुंतवणूकीची आवश्यकता आहे” असे हर्षवर्धन म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 28, 2020 1:38 pm

Web Title: mausam app launched for for weather forecasts in india get details sas 89
Next Stories
1 कमी किंमतीत शानदार फीचर्स, या ‘स्वस्त’ स्मार्टफोनचा भारतातील पहिलाच ‘सेल’
2 Realme Narzo 10 स्मार्टफोनच्या खरेदीवर शानदार कॅशबॅक ऑफर, किंमत…
3 चार हजारांनी स्वस्त झाला ‘ड्युअल सेल्फी कॅमेरा’ असलेला शानदार स्मार्टफोन, कंपनीने केली किंमतीत कपात
Just Now!
X