कॅफेची संस्कृती गेल्या बऱ्याच दिवसांपासून अशी काही तग धरुन गेली की त्यातून अनेकांच्या जिभेचे चोचले पुरवले गेलेच. पण, त्यासोबतच अनेकांच्या कल्पनाशक्तीचा सुरेख नमुनाही पाहायला मिळाला. सध्या नवी मुंबईमध्ये अशाच एका ठिकाणाची बरीच चर्चा होताना दिसत आहे. ‘बीएफएफ’ या नावाने ओळखलं जाणारं ‘ब्रुशिएतो फूड फॅक्टरी’ हे रेस्तरॉ सध्या खवैय्यांच्या आकर्षणाच्या केंद्रस्थानी आहे.

सहसा ‘बीएफएफ’ हा शब्द आपल्या एका खास मित्राला, मैत्रीणीला एखाद्या पोस्टमध्ये टॅग करण्यासाठी वापरला जातो. पण, या ट्रेंडमध्ये एका वेगळ्या बीएफएफची आता नव्याने एंट्री झाली आहे, असं म्हणायला हरकत नाहीये. एखादं रेस्तरॉ सहसा तिथे मिळणाऱ्या खाद्यपदार्थांसाठी ओळखलं जातं. पण, बीएफएफ म्हणजेच ब्रुशिएतो फूड फ्रक्टरी हे छोटेखानी रेस्तरॉ मात्र इथे मिळणाऱ्या खाद्यपदार्थांसोबतच तिथल्या इंटेरियरमुळेही ओळखलं जातंय. कन्व्हेयर बेल्टचा वापर करत त्या सहाय्याने आपली ऑर्डर देण्याची संकल्पना अविनाश पुजारी, चिराग पटेल आणि रोनित भोगले या तीन मित्रांना सुचली आणि त्यांनी त्यावर मेहनत घेतली. विज्ञान, तंत्रज्ञान या साऱ्या गोष्टींची सुरेख सांगड घालत बीएफएफ साकारलं गेलं आणि अनेकांनीच त्याला आपलंसं केलं.

switching your exercise routine have several benefits
काही ठराविक महिन्यानंतर व्यायामामध्ये बदल करणे आवश्यक आहे? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात..
Viral video petrol is being poured into the scooter from tansen tobacco pouch
VIDEO: पेट्रोल वाचवण्यासाठी व्यक्तीने केला स्मार्ट जुगाड; भावाचा जुगाड पाहून लावाल डोक्याला हात
thief ATM Kalyan, ATM Kalyan,
तब्बल ९२ एटीएम कार्डद्वारे डल्ला मारणाऱ्या चोराला कल्याणमध्ये अटक, आधीच १६ गुन्हे दाखल असल्याचंही उघड
How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या

वाचा : प्रवासखर्च कमी करण्याच्या सोप्या टिप्स

सुरुवातीच्या काळात हॉटेलिंग व्यवसायात या मित्रांच्या टीमला अपयश आलं. पण, त्यानंतर मात्र कल्पकतेचा अफलातून नमुना आणि तितकाच धमाल मेन्यू खवैय्यांसाठी सादर करत बीएफएफ नव्या अंदाजात सर्वांच्या भेटीला आलं. दरम्यान रेस्तरॉ व्यवसायात आणखीही काही महत्त्वाचे टप्पे गाठण्याचा मानस उराशी बाळगणाऱ्या या मित्रांच्या टीमला सध्या चांगलाच प्रतिसाद मिळत आहे हेच खरं.