News Flash

मोतीबिंदू वितळवून टाकणाऱ्या औषधाचा शोध

लीह एन मॅकले व कॅथरिन मॅकमेनिमेन यांनी क्रिस्टलिन व त्यांचे अमायलॉईड्स शोधून काढले.

| November 28, 2015 12:43 am

भारतीय संशोधिकेचा सहभाग

भारतीय वंशाच्या संशोधकासह काही संशोधकांनी मोतीबिंदू नष्ट करण्याचे डोळ्यात टाकण्याचे औषध शोधून काढले आहे. मोतीबिंदूमुळे दृष्टी जात असते. मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करता येत असली तरी ती तुलनेने खर्चीक असते व अनेक लोक विकसनशील देशात त्यामुळे उपचाराअभावी आंधळे होतात, असे संशोधकांचे मत आहे. मोतीबिंदू हा जास्त वयात होणारा नेत्ररोग असून काही प्रथिनांचे कार्य बिघडल्याने तो होतो. पार्किसन्सन म्हणजे कंपवात व अल्झायमर म्हणजे स्मृतिभ्रंशासारखाच तो विशिष्ट वयानंतर होतो. मोतीबिंदूत क्रिस्टलिन नावाची प्रथिने बाधित होतात. ही प्रथिने काही पेशींचा भाग असतात व त्या पेशींपासून डोळ्यांचे भिंग तयार होत असते, असे कॅलिफोर्निया विद्यापीठाचे जॅसन गेस्टविकी यांनी सांगितले.
लीह एन मॅकले व कॅथरिन मॅकमेनिमेन यांनी क्रिस्टलिन व त्यांचे अमायलॉईड्स शोधून काढले. अ‍ॅमायलॉईड्स हे लवकर वितळतात. मिशिगन विद्यापीठाच्या जिनॉमिक विभागाने म्हटले आहे की, एचटी डीएसएफ ही पद्धत वापरून अमायलॉइड्स तापवले, त्यात २४५० संयुगे वापरण्यात आली व त्यातील बारा हे स्टेरॉल्स होते. त्याचे नाव लॅनोस्टेरॉल असून त्यामुळे मोतीबिंदू नाहीसा होतो.
२०१५ मध्ये नेचर या नियतकालिकात हा निबंध प्रसिद्ध झाला होता पण लॅनोस्टेरॉलची विद्राव्यता कमी आहे. गेस्टविकी यांच्या मते ३२ स्टेरॉल्सची चाचणी नंतर केली गेली, त्यात संयुग २९ नावाचे रसायन मोतीबिंदूला वितळवून टाकते. यात क्रिस्टॅलिन्स स्थिर झाले तर अ‍ॅमालयलॉइडसची निर्मिती रोखण्यात आली. जे अ‍ॅमायलॉइडस आधी तयार झाले होते ते संयुग २९ नावाच्या रसायनाने वितळवून टाकले. उषा पी अँडले या वॉशिंग्टन विद्यापीठातील प्राध्यापिकेचा संशोधनात सहभाग असून डोळ्यात घालायच्या या औषधाने उंदरांचा मोतीिबदू बरा करण्यात आला. मानवी डोळ्यातून काढलेल्या मोतीबिंदूवर या रसायनाचे थेंब टाकले असता मोतीिबदू वितळून गेला. सायन्स नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 28, 2015 12:43 am

Web Title: medicine find on cataract
टॅग : Medicine
Next Stories
1 पुरेशा झोपेअभावी मधुमेह, लठ्ठपणाचा धोका
2 आक्रमक दृष्टिकोन रक्तदाब नियंत्रणासाठी किफायतशीर
3 मधुमेही जखमांवर जलदगती उपचारासाठी नवे औषध
Just Now!
X