News Flash

ग्लुकोमा रुग्णांसाठी स्पर्शभिंगातून औषध

ग्लुकोमाचे प्रारूप तयार करून त्यात नवीन स्पर्श भिंगाचा वापर करण्यात आला आहे.

| September 15, 2016 01:59 am

 

ग्लुकोमा या कायमचे अंधत्व आणणाऱ्या रोगावर उपाय म्हणून वैज्ञानिकांनी स्पर्शभिंग (काँटॅक्ट लेन्स) तयार केले असून त्यात डोळ्यात आपोआप औषध सोडण्याची सुविधा आहे त्यामुळे ग्लुकोमा रुग्णांची स्थिती सुधारते. वैज्ञानिकांच्या मते हे स्पर्शभिंग अभिनव असून त्यात औषधाची पॉलिमर फिल्म तयार करून त्यातून औषध सोडले जाते. ते नेहमी लॅटनोप्रोस्ट थेंब टाकण्यापेक्षा सोपे आहे. ग्लुकोमाचे प्रारूप तयार करून त्यात नवीन स्पर्श भिंगाचा वापर करण्यात आला आहे. कमी प्रमाणात औषध यात वापरले जाते व त्यात डोळ्यांतील दाब कमी होतो, असे अमेरिकेच्या हार्वर्ड मेडिकल स्कूलचे जोसेफ बी. सियोलिनो यांनी सांगितले. या भिंगांमुळे थेंबापेक्षा जास्त फायदा होतो असे दिसून आले आहे. ग्लुकोमामुळे जगात अनेक लोकांना कायमचे अंधत्व येत असते, त्यासाठी डोळ्यांतील दाब कमी करावा लागतो. थेंबामुळे डोळे चुरचुरतात आग होते व ते टाकणेही अवघड बनते. त्यामुळे थेंबाचा वापर ५० टक्के रुग्णातही शिस्तीने होत नाही. नव्या पद्धतीत औषध सध्याच्या उणिवा दूर करून आपोआप डोळ्यांत भिंगातूनच सोडले जाते. ऑक्युलर औषधे डोळ्यांत वापरण्यासाठी स्पर्शभिंग उपयोगी असते. या स्पर्श भिंगात औषध असलेला पॉलिमरचा पडदा असतो, त्यामुळे नियंत्रित प्रमाणात औषध घातले जाते. ग्लुकोमा झालेल्या माकडांवर याचे यशस्वी प्रयोग झाले आहेत.

(टीप : आरोग्यवार्तामधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी लोकसत्ताचा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.) 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 15, 2016 1:59 am

Web Title: medicine for glaucoma patients
Next Stories
1 आयुर्विज्ञान केंद्रात १६ हजार नेत्रपटल शस्त्रक्रिया
2 भारतात पोषण आहाराचे सेवन कमी
3 अवेळी जेवण… हृदयविकारास निमंत्रण!
Just Now!
X