वस्त्रे विणता विणता जीवनाचा गर्भितार्थ समजावून सांगणारे दोहे रचणारे संत कबीर आपल्या सगळ्यांनाच परिचयाचे असतील. वाराणसीच्या अरूंद गल्लीबोळांमध्ये चरितार्थासाठी रेशमी वस्त्रे आणि बनारसी साड्या विणताना कबीराच्या याच परंपरेशी नाते सांगणारे नाव म्हणजे मोहरम्म अली उर्फ हसन तुराबजी. वस्त्रे विणताना होणाऱा हातमागाचा विशिष्ट आवाज हेच मोहरम्म अलींच्या कवितांमागील प्रेरणास्थान. शाळेची पायरी कधीही न चढलेले मोहरम्म अलींचे हात हातमागावर जितक्या उत्कृष्टपणे चालतात, त्याच दर्जाचे काव्य ते अगदी सहजरित्या रचतात. वाराणसीतील स्थानिक मुशाहिरा, मजलिस आणि कवी संमेलनांमध्ये त्यांच्या कविता ऐकताना याचा प्रत्यय तुम्हाल येतो.
एक उत्कृष्ट विणकर आणि कवी असणाऱ्या मोहरम्म अलींचे वेगळेपण इथेच संपत नाही. साधारणत: काल्पनिक विश्वात आणि भावनांच्या हिंदोळ्यावर झोके घेणाऱ्या कवी माणसांसाठी काटेकोर आणि अचूकतेचे गणित पाळणारा यंत्राचा विषय हा तसा रूक्ष मानला जातो. मोहरम्म अलींचे वेगळेपण अधोरेखित होते ते इथेच. दोन वर्षांपूर्वी एका ‘लहान हातमागाच्या’ (mini handloom) निर्मितीचे पेटंट आणि राष्ट्रीय पुरस्कार देऊन भारत सरकारकडून त्यांचा गौरव करण्यात आला. पारंपरिक हातमागांवर काम करताना कारागिरांना काही समस्यांना सामोरे जावे लागते. हीच गोष्ट लक्षात घेऊन मोहरम्म अली यांनी हाताळweaver-mainण्यास सोपा आणि वस्त्रे विणण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या रेशमी धाग्याची कमीतकमी नासाडी होईल, असा हातमाग तयार केला. अली यांनी तयार केलेला हा हातमाग अवघ्या १२ इंचाच्या खोक्यात मावत असल्याने त्याची ने-आण करणेही अत्यंत सोपे आहे. मात्र, या क्षेत्राकडे सरकारने दुर्लक्ष केल्याची खंत ते व्यक्त करतात. सध्या सगळ्यांचाच ओढा यांत्रिक हातमागांकडे असला तरी, हे हातमाग विशिष्ट मर्यादेपर्यंतच उपयुक्त आहेत. कारण, वस्त्रांवरील उत्तम कलाकारीचा नमुना हातमागावरच तयार करता येऊ शकतो, असे त्यांचे म्हणणे आहे.
मोहरम्म अलींचा ‘कश्कन’ हा गझलांचा समावेश असणारा कवितासंग्रह २००२मध्ये प्रकाशित झाला होता. मात्र, अजूनही काही अडचणींमुळे त्यांच्या इतर कवितांचे प्रकाशन रखडलेले आहे. सध्या ते उर्दु साप्ताहिके आणि वृत्तपत्रांमधून कविता लिहत असतात. याशिवाय, सुप्रसिद्ध कवी गुलजार यांच्या हस्ते २००२ साली मिळालेला पुरस्कार माझ्या जीवनातील एक संस्मरणीय क्षण असल्याचे ते सांगतात. एक संवेदनशील कवी म्हणून ओळख असलेले मोहरम्म अली यापुढील काळातही आपल्या लेखणीतून सामाजिक मुद्द्यांवर आणि विणकरांच्या दयनीय परिस्थितीवर प्रभावीपणे भाष्य करताना दिसतील.

weaver-4

Perfect Brush For Healthy Teeth Why Adults Shall Use Kids Tooth Brush
तोंडाची दुर्गंधी कमी करण्यासह ‘या’ फायद्यांसाठी तुम्हीही वापरायला हवा लहान मुलांचा टूथब्रश; डॉक्टर काय सांगतात?
How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..
How To Make Gudi Padwa Sakhrechya Gathi At Home gudi padwa 2024
गुढी पाडव्यासाठी साखरेच्या गाठी यंदा बनवा घरीच, साखरेच्या बत्तास्यांची सोपी झटपट कृती