News Flash

सौंदर्यभान : मलाझ्मा

मलाझ्माला ‘वांगाचे डाग’ किंवा ‘गर्भधारणेचा मुखवटा’ ((Pregnancy mask) असेही संबोधतात.

डॉ. शुभांगी महाजन

आपला चेहरा स्वच्छ, सुंदर, नितळ दिसावा यासाठी प्रत्येकजण काही ना काही उपाय करत असतो. मात्र अनेकांच्या चेहऱ्याला वांगचा (मलाझ्मा) सामान करावा लागतो. ज्यामुळे चेहऱ्यावर डाग येऊन चेहरा विद्रूप दिसू लागतो.

मलाझ्मा म्हणजे काय?

मलाझ्मा हा त्वचेचा एक रंगद्रव्य विकार आहे जो प्रौढांच्या चेहऱ्यावर तपकिरी ठिपक्यांच्या स्वरूपात दिसून येतो. चेहऱ्याच्या दोन्ही बाजूंमध्ये, विशेषत: गाल, नाक, कपाळ आणि वरच्या ओठांचा यात सहभाग आहे. मलाझ्माला ‘वांगाचे डाग’ किंवा ‘गर्भधारणेचा मुखवटा’ ((Pregnancy mask) असेही संबोधतात.

हा आजार २५ ते ६० पर्यंत कोणत्याही वयात, स्त्री व पुरुष दोघांनाही होऊ  शकतो. मात्र स्त्रियांमध्ये हा आजार जास्त प्रमाणात आढळतो.

मलाझ्माची कारणे-

१) आनुवंशिकता – मेलानोसाइट्स (रंगद्रव्य पेशी) पासून होणाऱ्या मेलानिनच्या अत्यधिक उत्पादनामुळे रंगद्रव्य अधिक प्रमाणात तयार होते.

२) हार्मोन्स व हार्मोनल औषधे-

विशिष्ट हार्मोन्समधील चढ-उतारांमुळे मलाझ्मा होऊ  शकतो. म्हणूनच सामान्यत: गर्भधारणेदरम्यान ते उद्भवते.

३) सूर्यप्रकाश

४) त्वचेचा रंग- हादेखील एक कारणीभूत घटक आहे. फिकट त्वचेच्या रंगात हलके-रंगीत त्वचेपेक्षा रंगद्रव्य उत्पादक पेशी अधिक सक्रिय असतात. जर तुमची त्वचा फिकट ते मध्यम तपकिरी असेल तर मलाझ्मा होण्याची शक्यता जास्त असते. अतिशय हलकी आणि अतिशय गडद त्वचा प्रकारांवर मलाझ्मा सामान्यत: होत नाही.

मलाझ्माचे निदान-

मलाझ्मामुळे त्वचेत विशिष्ट बदल घडतात. जे बहुतेक डॉक्टर किंवा त्वचाविज्ञानी सहज ओळखू शकतात. त्वचेमध्ये मलाझ्माने किती आत प्रवेश केला आहे हे पाहण्यासाठी डॉक्टर वुड्स लॅम्पचा वापर करतात.

विविध प्रकार-

त्वचेत वाढलेल्या मेलेनिनच्या पातळीवरून मेलाझ्मा एपिडर्मल, डर्मल आणि मिश्र प्रकारात विभागला जातो.

मलाझ्मावर उपचार-

एकदा डॉक्टरांनी मलाझ्माचे निदान केले तर मग त्यासाठीचे कोणतेही ट्रिगर्स दूर करण्यासाठी तुमच्या जीवनशैलीत बदल करण्याची गरज असते.

यामध्ये आजीवन सनस्क्रीनचा वापर समाविष्ट आहे, जे यूव्हीए आणि यूव्हीबी लाइट्स रोखते. आयर्न ऑक्साइड असलेल्या सनस्क्रीनला प्राधान्य दिले जाते. कारण ते मलाझ्मा वाढवणाऱ्या दृश्यमान प्रकाशाला रोखतात.

तसेच काळे डाग कमी करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या उत्पादनांना सामान्यत: हायड्रोक्विनॉन व नॉन हायड्रोक्विनॉन उत्पादनांमध्ये विभागले जाते.

हायड्रोक्विनॉन : हे औषध त्वचेवरील काळे डाग कमी करून त्वचा फिकट करण्यास मदत करते. हायड्रोक्विनॉन मेलेनिनचे उत्पादन थांबवते आणि मेलेनिन तयार करणारे मेलेनोसाइट्स नष्ट करते. परंतु याचा वापर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करणे आवश्यक आहे. जर याचा वापर अधिक कालावधीसाठी केला गेला, तर त्याचे त्वचेवर गंभीर परिणाम होऊ  शकतात.

विविध उपचार पद्धती

१) लेझर रीसर्फेसिंग : त्वचेवरील अनियमित सुरकुत्या आणि चट्टे कमी करते.

२) लाइट थेरपी : एलईडी लाइट थेरपी ही इतर अधिक आक्रमक कॉस्मेटिक त्वचा उपचारांना पूरक बनविण्यासाठी मदत करतात परंतु, एक स्वतंत्र उपाय म्हणून उपयोगी नाही.

३) केमिकल पील

४) मायक्रोडर्माब्रॅशन आणि डर्माब्रॅशन

५) डर्माप्लेनिंग

वरील उपचार कदाचित मलाझ्माचे पॅचेस पूर्णपणे साफ करू शकत नाहीत आणि यशस्वी उपचारानंतरही मलाझ्मा परत येऊ  शकतो. त्यामुळे योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.

’  आपण मलाझ्माला कसे प्रतिबंधित करू शकता?

१) घरात असतानाही दररोज नियमित सनस्क्रीन लावणे हा मलाझ्मापासून बचाव करण्याचा पहिला मार्ग आहे. संगणकाच्या किंवा टॅब्लेटसमोर बराच वेळ बसून निळ्या प्रकाशाच्या संपर्कात येण्यामुळे मलाझ्मा आणखी वाढू शकतो.

२) अतिरिक्त संरक्षणासाठी, आपल्या सनस्क्रीनपूर्वी व्हिटॅमिन सी आणि ई यांसारख्या अँटीऑक्सिडंट्ससह एक सीरम लावणे कधीही उत्तम.

३) घराबाहेर ब्रॉड-ब्रिम्ड हॅट्स वापरावे.

४) इस्ट्रोजेन समाविष्ट करणाऱ्या हार्मोन ट्रीटमेंट्स टाळाव्या.

५) ज्यामध्ये तुमची त्वचा लाल होईल किंवा त्वचेची जळजळ होईल अशी सुगंधित सौंदर्य प्रसाधने वापरणे टाळावे.

६) आरोग्यदायी, संतुलित आहार घ्यावा आणि वजन संतुलित ठेवावे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 28, 2021 2:45 am

Web Title: melasma dark skin discoloration zws 70
Next Stories
1 Video : मासिक पाळीदरम्यान लस घ्यावी की नाही?, डॉक्टर म्हणतात…
2 सायबर गुन्हेगारांचे सोपे लक्ष्य
3 करोनाची दुसरी लाट : मानसिक तणावात भर
Just Now!
X