रुबाबदार व्यक्तिमत्त्व केवळ चेहऱ्याच्या सौंदर्यापुरते मर्यादित नसते. त्यात इतरही अनेक घटकांचा सहभाग असतो. त्यामुळे सौंदर्यप्रसाधनांबरोबरच कपडे, घडय़ाळे, अत्तर बाबींप्रमाणे चपला आणि बुटांची निवडही तितकीच महत्त्वाची ठरते. आपण पायात कोणत्या चपला अथवा बूट घातले आहेत, त्यावर आपला फॅशनसेन्स दिसून येतो. चामडे, कॅनव्हास, प्लास्टिक, रबर आदींपासून बूट बनविले जातात. पुरुषांच्या बुटांमध्ये रंगसंगती फारशी नसली तरी त्याच्या टेक्श्चरमध्ये बरीच विविधता असते. सध्या आपल्याकडे कमी वजनाच्या पॉलियुरेथिनपासून फॉर्मल व टी.पी.आर.पासून सेमी फॉर्मल किवा कॅज्युअल प्रकारचे बूट वापरले जातात. भारतीयांकडे कमीत कमी फॉर्मल, कॅज्युअल्स किंवा स्पोर्ट्स (हेल्थ कॉन्शिअस) असे तीन पद्धतीचे बूट असणे सध्याच्या जीवशैलीमध्ये आवश्यक आहे.

‘मेडिकेटेड पादत्राणे’

survival of marine species in danger due to ocean warming
विश्लेषण : महासागर तापल्याने प्रवाळ पडू लागलेत पांढरेफटक… जलसृष्टीचे अस्तित्वच धोक्यात?
Height of Your Shadow Tells How Much Vitamin D Is Absorbed In Body
तुमच्या सावलीची उंची सांगते शरीराविषयी खूप महत्त्वाची ‘ही’ बाब; तज्ज्ञ सांगतात, उन्हाळ्यात कसा घ्यावा अंदाज?
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
rashmi barve
रामटेकमधील काँग्रेस उमेदवार रश्मी बर्वे यांचे जात प्रमाणपत्र प्रकरण काय आहे? उमेदवाराची जातवैधता छाननी प्रक्रिया कशी असते?

टाच, घोटा किवा गुडघा यांच्यापासून होणाऱ्या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी मेडिकेटेड पादत्राणे ही तरुण व मोठय़ांमध्ये सध्याच्या काळात प्रचलित आहेत. या पादत्राणांमध्ये असणाऱ्या जास्त कुशनमुळे (मऊ-फुगीर भाग) संपूर्ण पायाला आरामदायीपणा मिळतो. या पादत्राणांचे वैशिष्टय़ म्हणजे नेहमीच्या स्टाइलबरोबरच वेगवेगळ्या प्रकारातही मिळतात. त्यामुळे आपण ते पार्टी किंवा खास कार्यक्रमांसाठीही वापरू शकतो.

‘इटालियन शूज’

व्यावसायिक अथवा कॉर्पोरेटमध्ये नोकरी करणाऱ्यांमध्ये इटालियन शेप शूज स्टाइल खूप प्रसिद्ध आहे. गेल्या वर्षांपासून हॉलीवूड व बॉलीवूड अभिनेत्यांमुळे इटालियन शूज अधिक प्रमाणात वापरात आले आहेत. फॉर्मल लेदर शूजच्या तुलनेत लेदरचा दर्जा व सोल यामध्ये वेगळेपण असलेले हे शूज सूट किंवा न्यारो बॉटम पॅण्टवर चांगल्या प्रकारे उठून दिसतात. पुढून असलेल्या निमुळत्या आकारामुळे हे शूज आपल्या पायाला आरामदायी वाटतात.

‘लोफर्स शूज’

आबालवृद्धांमध्ये ‘लोफर्स शूज’ खूप प्रसिद्ध आहेत. हॉलीवूड व बॉलीवूड अभिनेत्यांमुळे प्रसिद्धीस पावलेले हे शूज अतिशय आरामदायक आहेत. लोफर्स हे आपण जीन्स, फॉर्मल किवा कोणत्याही प्रकारच्या पॅण्टवर घालू शकतो. विविध रंगांचे लोफर्स शूज हे लेदर अथवा नॉन-लेदरमध्येही उपलब्ध आहेत. या शूजचे वैशिष्टय़ म्हणजे याचा वरील भाग हा लांबीने छोटा असल्याने यात हवा खेळती राहते. त्यामुळे तळव्याला येणाऱ्या घामाचे प्रमाण कमी होते. हे शूज इझी टू वेअर (सहज घालता येणारे) असल्याने मोज्यांसहित किंवा मोजे न घालताही वापरू शकतो.

‘जनरेशन नेक्स्ट शूज’ 

गेल्या एक-दोन महिन्यांपासून जेन एक्स म्हणजेच जनरेशन नेक्स्ट शूज हे मुलांपासून ते मोठय़ांपर्यंत सगळ्यांच्या पसंतीस उतरले आहेत. या बुटांचा वरील भाग कॅज्युअल्ससारखा असतो व सोल हे स्पोर्ट्स शूजसारखे असतात. या शूजचे वैशिष्टय़ म्हणजे यात असलेले मेमरी पॅड. या मेमरी पॅडमुळे आपल्याला तळव्यापासून ते घोटय़ापर्यंत पूर्ण आराम मिळतो. हे शूज आपण पाश्चिमात्य किंवा कॅज्युअल्स ड्रेसवर परिधान करू शकतो. या शूजचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे यात असलेल्या लवचीक सोलमुळे पाय मुरगळण्याची शक्यताही कमी होते.

‘अँकल शूज’

भटकंती किंवा बिझनेस करणाऱ्या व्यक्तींबरोबरच महाविद्यालयीन तरुणांमध्ये अँकल शूज खूप प्रसिद्ध आहेत. जितेंद्र व मिथुन चक्रवर्ती यांच्या काळापासून प्रचलित झालेल्या या बुटांमुळे आपल्या व्यक्तिमत्त्वास एक वेगळा लुक येतो. या शूजची हिल ही क्यूबन प्रकारची म्हणजेच घरातील बर्फाच्या भांडय़ातील बर्फासारखी वरील भागात मोठी व खाली छोटी असते. तसेच या बुटाच्या सोलमध्ये लावण्यात येणाऱ्या अधिकच्या हिलमुळे हे बूट कमी उंची असणाऱ्या लोकांसाठीही खूप उपयुक्त ठरतात.

‘पठाणी सॅण्डल्स’

महाविद्यालयीन तरुणांमध्ये सध्या पठाणी सॅण्डल्स फार प्रचलित आहेत. त्यांचा टू इन वन लुक खूप जणांना आवडतो. या सॅण्डल्सच्या पुढील बाजू शूजसारख्या बंद असतात व मागच्या बाजू नेहमीच्या सॅण्डल्ससारख्या उघडय़ा असतात. या सॅण्डल्स जीन्स किंवा न्यारो बॉटम पॅण्टबरोबरच पारंपरिक पोशाखावरही चांगल्या प्रकारे उठून दिसतात.

‘लेदर जुती’

हल्लीच्या तरुणाईला लेदर जुती या आऊट स्टीच सोल शूजने भुरळ घातली आहे. लेदर जुतीचे वैशिष्टय़ म्हणजे या शूजमध्ये डिझायनर सोल हे आतल्या भागात असतात व बाहेरील मुख्य सोल हे सपाट असते. मोजडीसारखेच दिसणारे हे बूट आपण फॉर्मल किवा वेस्टर्न कपडय़ांवर घालू शकतो. या बुटांचे वेगळेपण म्हणजे मोजडीसारखे दिसत असूनही हे शूज स्पोर्ट्स शूज सारखीच लवचीकता व आराम प्रदान करतात.

कुठे मिळतील?

चर्चगेट येथील फॅशन स्ट्रीट, बांद्रा येथील िलकिंग रोड अंधेरी लोखंडवाला मार्केट येथे अशाप्रकारचे शूज मिळतील. या शूजच्या किंमती साधारणपणे ३००-८०० रुपयांपर्यंत आहेत.

शूज एक्स्पर्ट सचिन हळदणकर यांनी बूट व पायांचे आरोग्य याबाबत केलेल्या सूचना- 

  • सर्व ऋतूमध्ये आपल्या पायांची विशेषत: तळव्यांची व टाचांची नीट निगा राखणे गरजेचे आहे. त्यासाठी आठवडय़ातून एकदा पूर्ण दिवस मोजे न घालता राहावे, कारण त्यामुळे तळव्याला हवा मिळते.
  • बूट घालताना शक्यतो मोजे घालावेच.
  • आपल्या बुटांची चमक टिकविण्यासाठी व लेदरला चकचकीत करण्यासाठी आठवडय़ातून २ ते ३ वेळा पॉलिश करणे गरजेचे आहे.
  • आपले बूट हे वर्षभराच्या अंतराने बदलावेत.
  • आपण नवीन घेतलेले बूट हे जास्त दिवस बॉक्समध्ये ठेवू नये. ते घेतल्यावर १० ते १५ दिवसांत घालावयास काढणे.
  • कार्यालयामध्ये बूट व मोजे काढून स्लीपरवर फिरावे. त्यामुळे तळव्यांना जास्तीत जास्त हवा मिळेल.