मर्सिडिज असे नुसते म्हटले तरी आपल्या डोळ्यासमोर अतिशय अलिशान अशी कार येते. मर्सिडिजने नुकतीच आपली आणखी एक ल्कझरियस कार लाँच केली असून त्या कारचे नाव Mercedes-AMG S 63 कूपे असे आहे. याआधी कंपनीने ई क्लास रेंजची टॉप मॉडेल लाँच केली होती. या गाडीचं इंजिन ६१२ हॉर्सपावरच्या ताकदीचे आहे. याबरोबरज हे इंजिन ९०० न्यूटन मीटर टॉर्क जनरेट करते. इंजिनला ९ स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन देण्यात आले आहे. ० ते १०० किलोमीटर प्रति तास हा स्पीड घेण्यासाठी या कारला केवळ ३.५ सेकंद लागतात.

या गाडीचा टॉप स्पीड २५० किलोमीटर प्रति तास इतका आहे. या कारमध्ये नव्या ग्रिल्स आणि मोठे एअर इनटेकर्स लावण्यात आले आहेत. तसेच कारला १९ इंचाचे अलॉय व्हिल्स ही देण्यात आले आहेत. सध्या या कारचे मर्यादित युनिट्स भारतात विक्री केले जाणार आहेत. या कारमध्ये लेदर आणि मागील सिटवर बॅकरेस्ट्स आहेत. या कारला १२.३ इंच टीएफटी वाइडस्क्रीन कलर डिस्प्ले देण्यात आला आहे. या कारमध्ये ४ लिटर Twin-Turbo, V8 इंजिन देण्यात आले आहे. या कारची किंमत २.५५ कोटी रुपये ठेवण्यात आली आहे.