नवरात्र व दसरा या सणांच्या काळात शुभ मुहूर्त साधून ‘मर्सिडीज बेंझ’च्या ५५० गाडय़ा देशभरातील विविध ग्राहकांना सणासुदीच्या दिवसांत सुपूर्द केल्या. २०१९ मधील नवरात्र व दसऱ्याच्या दिवसांमध्ये झालेल्या विक्रमाच्या बरोबरीने ही कामगिरी आहे.

दिल्ली-एनसीआर, मुंबई आणि गुजरातसारख्या प्रमुख बाजारपेठांमध्ये ग्राहकांची जोरदार मागणी वाढली असून परिस्थिती पुन्हा सामान्य होऊ  लागली असल्याचे दिसून येत आहे. टाळेबंदी संपून व्यवसाय स्थिर व्हावेत, ही आकांक्षा सर्वच थरांतील नागरिकांमध्ये आहे असेही दिसते. ‘मर्सिडीज बेंझ’च्या आकर्षक उत्पादनांच्या पोर्टफोलिओमुळेही ग्राहकांचा आत्मविश्वास वाढला आहे. नवनव्या उत्पादनांमुळे हा पोर्टफोलिओ सुधारत चालला आहे. नावीन्यपूर्ण अशा वित्तपुरवठा योजना आणि विविध सवलती यांची भर पडल्याने ग्राहकांना त्यांच्या अपेक्षेहून अधिक मूल्य मिळू लागले आहे. दिल्ली-एनसीआर, मुंबई, गुजरात आणि उत्तरेकडील अन्य शहरांमध्ये ५५० गाडय़ांचे विक्रमी वितरण यंदा झाले. एकटय़ा ‘दिल्ली-एनसीआर’मध्ये १७५ नवीन मर्सिडीज-बेंझ कार त्यांच्या मालकांच्या ताब्यात देण्यात आल्या. करोनाचे संकट असतानाही २०२० मधील तिसऱ्या तिमाहीतील प्रत्येक महिन्यात ‘मर्सिडीज बेंझ’च्या विक्रीमध्ये अनुक्रमे वाढ होत गेलेली आहे.

‘किआ सॉनेट’ची विक्री ५० हजारांपार

किआ सॉनेट कंपनीच्या अपेक्षेवर खरी उतरली आहे. दोन महिन्यात या कारची ५० हजारांहून अधिक युनिट्सची विक्री झाली आहे. कंपनीने या कारला सप्टेंबर महिन्यात बाजारात उतरवली होती. त्यानंतर १२ दिवसात कंपनीने ९ हजार २०० हून अधिक किआ सॉनेटच्या युनिट्सची विक्री केली होती. किआ सॉनेटची भारतात सुरुवातीची किंमत ६.७१ लाख रुपये आहे. या कारच्या टॉप मॉडेलची किंमत ११.९९ लाख रुपये आहे. या सेगमेंटमध्ये भारतात खूप स्पर्धा आहे. त्यामुळे कंपनीने या कारची किंमत अ‍ॅग्रेसिव्ह ठेवली आहे. किआच्या या कॉम्पॅक्ट एसयूव्हीला १०.२५ इंचाचा टचस्क्रीन इन्फोटेंटमेंट सोबत आणले आहे. याशिवाय, इलेक्ट्रिक सनरूफ, फ्रंट वेंटिलेटेड सीट्स दिले आहेत. या कनेक्टेड कारला स्मार्टवॉचने कनेक्ट करता येऊ शकते. कंपनीने या कारला कनेक्टेड कार म्हणून आणले आहे. ही कार आयएमटी आणि व्हायरस प्रोटेक्शन यासारख्या हायटेक फीचर्ससोबत आणली आहे.