MG Gloster Premium SUV : एमजी मोटर इंडियाने आज, गुरुवारी भारतातील पहिली ऑटोनॉमस (लेव्हल १) प्रीमियम एसयूव्ही, एमजी ग्लॉस्टर सादर केली आहे. भारतातील पहिली इंटरनेट कार हेक्टर, भारतातील पहिली इंटरनेट विद्युत एसयूव्ही झेडएस इव्ही यानंतर ग्लॉस्टर हे एमजीचे तिसरे उत्पादन आहे. ऑटोनॉमस (लेव्हल १) प्रीमियम एसयूव्हीची सुरुवातीची किंमत २८ लाख ९८ हजार रुपये इतकी आहे.

ऑटोनॉमिस लेव्हल१ फीचर्स ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स’सह इंडस्ट्री-फर्स्ट कॅप्टन सीट असलेल्या सॅव्ही ट्रिमची किंमत ३५.३८ लाख रुपये असून यात लक्झरी व तंत्रज्ञानाचे परिपूर्ण मिश्रण त्यात आहे. यात इतर सुविधांसह फॉरवर्ड कोलायजन वॉर्निंग, ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेकिंग, लेन डिपार्चर वॉर्निंग, ऑटोमॅटिक पार्किंग असिस्ट आणि अडॉप्टिव्ह क्रूस कंट्रोलचा समावेश आहे.

अतिशय मोहक डिझाइन आणि आकर्षक वैशिष्ट्यांसह २५ लाखांपासून ५० लाख रुपयांपर्यंतच्या रेंजमध्ये ग्लॉस्टर ही प्रीमियम व लक्झरी गाडी उपलबद्ध आह. भारतात ती सुपर, स्मार्ट, शार्प आणि सॅव्ही या ४ फीचर-इंटेन्सिव्ह प्रकारात उपलब्ध आहे. एमजी कंपनी ग्राहकांना लक्झरीयस बकेट सिट (६ सीटर आणि ७-सीटर ), टू-व्हील ड्राइव्ह, आणि फोर-व्हील ड्राइव्ह अशा विविध कॉम्बिनेशनमध्ये निवडीसाठी दोन इंजिन निवडींचे पर्याय देते. यात ट्विन टर्बोचार्ज्ड डिझेल इंजिनचाही समावेश आहे.

एमजी ग्लॉस्टर ही या सेगमेंटमधील पहिली अ‍ॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम आहे. यातील काही वैशिष्टय़ांमध्ये अडाप्टिव्ह क्रूस कंट्रोल, ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेकिंग आणि ऑटोमॅटिक पार्किंग असिस्ट आदींचा सहभाग आहे. तर फॉरवर्ड कोलायजन वॉर्निग, लेन डिपार्चर वॉर्निग आणि ब्लाइंड स्पॉट डिटेक्शन ही देखील कारची वैशिष्टय़े आहेत. ग्लॉस्टरमध्ये बहुविध ड्रायव्हिंग मोड्स आहेत. व्हेइकल ऑफ रोडिंगदरम्यान नियंत्रण मिळवण्यासाठी यात इंटेलिजंट ऑल टेरेन सिस्टीम असून यात समर्पित रिअल डिफरन्शिअल आणि बोर्गवॉर्नर ट्रान्सफर केस अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक शिफ्ट ऑफ द फ्लाय टेक्नॉलॉजी आहे. यात स्नो, सॅण्ड, इको, स्पोर्ट, नॉर्मल आणि रॉक या नावांचे सात वेगवेगळे ड्राइव्ह मोड्स आहेत.

एमजी ग्लॉस्टर मधील आणखी वैशिष्टय़ म्हणजे एमजी आय-स्मार्ट तंत्रज्ञान, याद्वारे एकूणच वाहनाचा अनुभव वाढतो. या क्षेत्रात प्रथमच क्रिटिकल टायर प्रेशर व्हॉइस अलर्ट, शॉर्टपेडिया अ‍ॅप हा सुविधा आल्या असून याद्वारे स्मार्टफोनवर न्यूज समरी आणि अँटी थेफ्ट इमोबिलायझेशन दिले जाते. तसेच इंजिन इग्निशनदेखील दुरून थांबवता येते. मॅपमायइंडिया चे थ्रीडी मॅप यात असून त्यात रस्त्यावरील खड्डे, स्पीड अलर्टसह कोव्हिड टेस्टिंग सेंटरदेखील नकाशात दाखवले जातात. यासोबतच, ग्लोस्टर ग्राहकांना अ‍ॅपल वॉच कनेक्टिव्हिटी मिळेल. जेणेकरून ते व्हॉइस कंट्रोलसह गाना अ‍ॅप त्यावरून ऑपरेट करू शकतील.

सर्व ४ प्रीमियम एसयूव्ही आता सामान्य १,००,००० रुपयांच्या बुकिंग किंमतीत, एमजी च्या २०० पेक्षा जास्त एक्सपेंसिव्ह नेटवर्क सेंटर्सवर, तिच्या (www.mgmotor.co.in) वेबसाइटवर किंवा एमजी मोबाईल अॅपवर उपलब्ध आहे.