News Flash

‘टोयोटा इनोव्हा’ला टक्कर, जुलैमध्ये येतेय MG Hector Plus; किंमत किती?

'एमजी'ची भारतातील दुसरी कार...

ख्यातनाम ब्रिटिश कार निर्माता कंपनी एमजी मोटरने(मॉरिस गॅरेज) गेल्या वर्षी ‘हेक्टर’ या कारद्वारे भारतीय बाजारात पदार्पण केल्यानंतर आता एमजी मोटर इंडियाने ही कार नवीन 6/7 सीटर व्हर्जनमध्ये लाँच करण्याची तयारी केली आहे. कंपनीने बहुप्रतीक्षित MG Hector Plus या आपल्या नव्या कारच्या प्रोडक्शनलाही सुरूवात केली आहे. Hector Plus ची भारतात लाँच झाल्यानंतर टोयोटा इनोव्हा क्रिस्टा, Tata Gravitas आणि Mahindra XUV500 यांसारख्या गाड्यांसोबत टक्कर असेल.

गुजरातच्या हलोल येथील प्रकल्पात हेक्टर प्लसच्या उत्पादनाला सुरूवात झाली आहे. ही कार कंपनीने सर्वप्रथम ऑटोएक्सपो 2020 मध्ये सादर केली होती. पुढील महिन्यात MG Hector Plus (6 सीटर )  लाँच होईल. पण, 7 सीटर व्हर्जनसाठी तुम्हाला वाट बघावी लागेल. 7 सीटर व्हर्जन वर्षाअखेरीस लाँच केले जाण्याची शक्यता आहे.

नव्या कारला थिक एलईडी डीआरएल, ऑल-ब्लॅक ग्रिल, रेस्टलेड फ्रंट बंपर, हेडलाइट आणि फॉग-लँप क्लस्टर, रिअर बंपर्स, नवी रिअर टेल लाइट डिझाइन आणि रिव्हाइज्ड स्कीड प्लेट्सद्वारे पूर्ण नवीन डिझाइन देण्याचा कंपनीने प्रयत्न केला आहे. कारच्या मधल्या ‘रो’मध्ये कॅप्टन सीट आहे. त्यामुळे प्रवाशांना सर्वोत्कृष्ट आरामाचा अनुभव मिळेल, असा दावा कंपनीने केला आहे. “हेक्टर प्लस ही विशेषत्वाने कौटुंबिक गरजा लक्षात घेऊन बनवण्यात आली असून यात मधल्या रोमध्ये कॅप्टन सीट असून तिसऱ्या रोमध्ये किशोरवयीन मुलांसाठी जागा आहे. हेक्टर ब्रँडच्या फॅमिलीत समाविष्ट झालेली हेक्टर प्लस ही आधुनिक तंत्रज्ञान, सुरक्षितेच्या बाबतीत सर्वोत्कृष्ट आणि अतुलनीय आरामदायी असल्याने ती स्मार्ट चॉइस असेल”, असे एमजी मोटर इंडियाचे प्रमुख प्रकल्प अधिकारी मनीष मनेक म्हणाले.

सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या हेक्टरची किंमत 12.73 लाख रुपये ते 17.43 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. Hector Plus च्या किंमतीबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही. पण या कारची किंमत इनोव्हा क्रिस्टापेक्षा एक-दोन लाख रुपये कमी असू शकते. जवळपास 16 लाख रुपये इतकी या कारची बेसिक एक्स-शोरुम किंमत असण्याची शक्यता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2020 5:06 pm

Web Title: mg hector plus production starts will be launched in july sas 89
Next Stories
1 recipe : ४५ मिनिटांत घरच्या घरी तयार करा पॅन तंदुरी चिकन
2 शरीरावरील चामखीळ घालविण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय कराच
3 SBI ची नवीन सेवा लाँच, आता घरबसल्या करा ‘हे’ महत्त्वाचं काम
Just Now!
X