News Flash

3000 रुपयांनी स्वस्त झाला Xiaomi चा जबरदस्त स्मार्टफोन, होईल 6000 रुपयांची बचत; जाणून घ्या ऑफर

8 जीबी रॅम, 64 मेगापिक्सेल कॅमेरा; शिवाय 8K व्हिडिओ रेकॉर्डिंगही शक्य

जर एखादा चांगला प्रीमियम स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचारात असाल तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. शाओमी कंपनीचा दमदार स्मार्टफोन Mi 10T आता स्वस्त झाला आहे.

6000 रुपयांची बचत :-

शाओमी कंपनीने Mi 10T च्या किंमतीत तीन हजार रुपयांची कपात केली आहे. याशिवाय फ्लिपकार्ट किंवा शाओमीच्या (Mi.com) वेबसाइटवरुन हा फोन खरेदी करताना आयसीआयसीआय बँकेच्या डेबिट/ क्रेडिट कार्ड आणि ईएमआय व्यवहारावर तीन हजार रुपये इंस्टंट डिस्काउंट मिळेल. म्हणजेच Mi 10T फोनच्या खरेदीवर तुमची सहा हजार रुपये बचत होऊ शकते.

Mi 10T स्पेसिफिकेशन्स :-

Mi 10T फोनमध्ये 6.67 इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले असून ऑक्टा-कोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 865 प्रोसेसर यात आहे. MIUI 12 पर आधारित अँड्रॉइड 10 वर कार्यरत असलेल्या या फोनला क्वॉलकॉम एड्रेनो 650 जीपीयूचा सपोर्ट आहे. लाइट्निंग-फास्ट 5G कनेक्टिव्हिटीसाठी यात X55 मॉडेम आहे. हा फोन 6 जीबी आणि 8 जीबी रॅम अशा दोन रॅमच्या पर्यायात येतो. फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. यात 64 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा असून अन्य दोन कॅमेरे अनुक्रमे 12 मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड सेन्सर आणि 5 मेगापिक्सेल मॅक्रो शूटर आहेत. तसेच सेल्फीसाठी फोनमध्ये 20 मेगापिक्सेलचा अल्ट्रा-क्लिअर सेन्सरही आहे. या फोनमधून 8K व्हिडिओ रेकॉर्डिंग देखील शक्य आहे. याशिवाय फोनमध्ये 33W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000mAh क्षमतेची बॅटरी मिळेल.

Mi 10T नवीन किंमत :-

कंपनीने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये Mi 10T हा स्मार्टफोन 6GB RAM आणि 8GB RAM अशा दोन व्हेरिअंट्समध्ये आणला होता. आता कंपनीने या दोन्ही व्हेरिअंटच्या किंमतीत 3 हजार रुपयांची कपात केली आहे. कपातीनंतर Mi 10T च्या बेसिक व्हेरिअंटची(6GB+128GB) किंमत 32 हजार 999 रुपये झाली आहे. तर, 8GB+128GB व्हेरिअंटची किंमत 34 हजार 999 रुपये झाली आहे. पण इंस्टंट डिस्काउंटच्या फायद्यामुळे हे दोन्ही व्हेरिअंट अनुक्रमे 29 हजार 999 रुपये आणि 31 हजार 999 रुपयांमध्ये खरेदी करता येऊ शकतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 5, 2021 1:51 pm

Web Title: mi 10t price cut in india check new price offer and specifications sas 89
Next Stories
1 6000mAh बॅटरी + 4जीबी रॅम, किंमत 8,999 रुपये; स्वस्त स्मार्टफोनचा पहिलाच ‘सेल’
2 ‘शाओमी’चा धमाका ! Redmi Note 10 सीरिज भारतात लाँच, किंमत 11 हजार 999 रुपयांपासून सुरू
3 कोरड्या खोकल्यापासून सांधेदुखीपर्यंत, जाणून घ्या अक्रोड खाण्याचे फायदे
Just Now!
X