शाओमी कंपनीने भारतात आपल्या ‘स्मार्ट लिव्हिंग’ अंतर्गत नवीन स्मार्टबँड ‘एमआय बँड 4’ (Xiaomi Mi Band 4) नुकतेच लाँच केले. पहिल्यांदाच या स्मार्टबँडची भारतात विक्री होत असून ई-कॉमर्स संकेतस्थळ अॅमेझॉन आणि शाओमीचं अधिकृत संकेतस्थळ Mi.com वर दुपारी 12 वाजेपासून(दि.19) सेलला सुरूवात झाली आहे. गेल्या वर्षी लाँच केलेल्या ‘एमआय बँड 3’ ला भारतीय ग्राहकांचा शानदार प्रतिसाद मिळाल्यानंतर कंपनीनं त्याचं पुढचं व्हर्जन लाँच केलं आहे.

काय आहेत फीचर्स –
हा स्मार्टबँड 0.95 इंच कलर्ड AMOLED टच डिस्प्लेसह येतो. यामध्ये 2.5D कर्व्ड ग्लास प्रोटेक्शन आहे. Mi Band 4 मध्ये एसएमएस, Whatsapp यांसारख्या अॅप्सच्या नोटिफिकेशन्स सोबतच फिटनेस स्टॅट्सदेखील चेक करता येतात. Mi Band 4 द्वारे ट्रेडमिल रनिंग, आउटडोर रनिंग, सायकलिंग, वॉकिंग किंवा पूल स्वीमिंग आदि ट्रॅक करु शकतात. याद्वारे 24 तास हृदयाच्या ठोक्यांची मॉनीटरिंग करता येते. आकर्षक पाच रंगांमध्ये हे स्मार्टबँड उपलब्ध आहे.

फोन शोधण्यास मदत –
याशिवाय फोनमध्ये येणाऱ्या टेक्स्ट मेसेज आणि व्हॉइस कॉल्सचं नोटिफिकेशन देखील मिळेल. हरवलेला फोन शोधण्यासाठी यामध्ये डिव्हाइस फाइंडर हे फीचर आहे. याशिवाय स्टॉपवॉच, अलार्म, आयडल अलर्ट, इनकमिंग कॉल अलर्ट आणि गोल नोटिफिकेशन यांसारख्या फीचर्सचाही सपोर्ट आहे. 5 दिवसांपर्यंतच्या हवामानाबाबतही यामध्ये मिळेल. तसंच यामध्ये नवीन स्विम ट्रॅकिंग फीचर देखील आहे. यात 5 विविध स्विम-स्टाइलचा समावेश करण्यात आला आहे.

आणखी वाचा : Amazon Alexa सोबत आता हिंदीत बोला !!

20 दिवस बॅटरी लाइफ आणि किंमत –
या फिटनेस ट्रॅकरमध्ये 135 mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली असून तब्बल 20 दिवसांची बॅटरी लाइफ मिळेल असा कंपनीचा दावा आहे. दोन हजार 299 रुपये इतकी या स्मार्टबँडची किंमत आहे.