30 May 2020

News Flash

108 MP + पाच रिअर कॅमेऱ्यांचा सेटअप, Xiaomi Mi CC9 Pro झाला लाँच

शाओमीचा हा पहिला आणि जगातील दुसरा पाच रिअर कॅमेरे असलेला फोन

शाओमी कंपनीने आपला नवा फ्लॅगशिप स्मार्टफोन Mi CC9 Pro चीनमध्ये लाँच केला आहे. शाओमीचा हा पहिला आणि जगातील दुसरा पाच रिअर कॅमेरे असलेला फोन आहे. फोनमध्ये तब्बल 108 मेगापिक्सल क्षमतेचा मुख्य कॅमेरा आहे. डिझाइनच्या बाबतीत स्टायलिश असलेल्या या फोनमध्ये कर्व्ह्ड OLED डिस्प्ले देण्यात आला आहे.

या फोनमध्ये कंपनीने अनेक शानदार फीचर्स दिले आहेत. मात्र या फोनचं सर्वात खास वैशिष्ट्य म्हणजे यातील पेंटा (5) रिअर कॅमेरा सेटअप. यात फोनच्या मागील बाजूला मुख्य कॅमेरा 108 मेगापिक्सलसह 5 मेगापिक्सल टेलिफोटो लेंस, 12 मेगापिक्सल पोर्ट्रेट सेंसर, 20 मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड लेंस आणि एक 2 मेगापिक्सल मॅक्रो लेंस आहे. याशिवाय सेल्फीसाठी या फोनमध्ये 32 मेगापिक्सल क्षमतेचा कॅमेरा आहे. हा कॅमेरा डिस्प्लेमधील डॉट नॉचमध्ये देण्यात आलाय. फोनमध्ये फुल एचडी+ रिझोल्युशनसह 6.47 इंचाचा कर्व्ह्ड OLED डिस्प्ले आहे.

आणखी वाचा- Xiaomi Redmi Note 8 चा सेल आज, ऑफरमध्ये मिळेल ‘डबल डेटा बेनिफिट’

अँड्रॉइड 9 पायवर आधारित MIUI 10 वर कार्यरत असणाऱ्या या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 730G प्रोसेसर आहे. 6जीबी आणि 8जीबी रॅम अशा दोन व्हेरिअंट्समध्ये उपलब्ध असलेल्या या फोनची इंटर्नल मेमरी 256जीबीपर्यंत वाढवता येते. यात फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5,260mAh क्षमतेची दर्जेदार बॅटरी असून फिंगरप्रिंट सेंसर, एनएफसी सपोर्ट आणि Hi-Res ऑडिओ यांसारखे अनेक शानदार फीचर्स यात आहेत. हा फोन कंपनीने सध्या केवळ चीनमध्येच लाँच केलाय, पण लवकरच हा फोन भारतात लाँच केला जाण्याची शक्यता आहे. चीनमध्ये या फोनच्या 6जीबी रॅम+128जीबी इंटर्नल स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 2,799 युआन (जवळपास 28000 रुपये) आहे. तर, 8जीबी रॅम+128जीबी इंटर्नल स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 3,099 (जवळपास 31,000 रुपये) आणि 8जीबी रॅम+256जीबी इंटर्नल स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 3,499 युआन (जवळपास 35,000 रुपये) आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 5, 2019 4:32 pm

Web Title: mi cc9 pro launched in china with 108 megapixel penta lens camera setup sas 89
Next Stories
1 तात्काळ मिळणार PAN कार्ड, आयकर विभागाची नवी सेवा
2 Panipat Trailer: ‘मराठ्यांचा इतिहास मराठीतही हवा’; चित्रपट डब करण्याची मागणी
3 खड्ड्यांमुळे इंजिनिअर तरुणीचा बाईकवरुन पडून मृत्यू, वडिलांविरोधात गुन्हा
Just Now!
X